पवनचक्कीचे पाते कोसळले.... दोन ठार...

नगर- मनमाड रोडवरील अहमदनगर तालुक्यातील देहरे  शिवारात आज पहाटे दीड वाजता भीषण अपघात झाला. कंटेनरमधून वाहतूक केले जाणारे पवनचक्कीचे पाते जीपवर कोसळले. यामध्ये एकाच कुटुंबातील दोघे ठार झाले. 


सुशीला विलास रासकर, शाम बाळासाहेब रासकर (दोघे रा. खंडाळा ता. श्रीरामपूर) असे मयत व्यक्तीची नावे आहेत.

अपघातात तिघे जखमी झाले आहेत. विलास अविनाश रासकर, आनंद विलास रासकर आणि शिल्पा शाम रासकर (सर्व रा. खंडाळा) असे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

जखमींवर अहमदनगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयत आणि जखमी हे बोलेरो जीपमधून देवदर्शनाला जात असताना अहमदनगर- मनमाड रोडवरील देहरे शिवारात त्यांच्या जीपवर पवनचक्कीचे पाते पडले. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post