नगर : जिल्हा सहकारी बॅंकेच्या तिसऱ्या मजल्यावरील एका विभागाला शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास आग लागली.
जिल्हा बॅंकेच्या इमारतीतच तिसऱ्या मजल्यावर जिल्हा सहनिबंधकांचे कार्यालय आहे. सायंकाळी सात वाजता धूर निघताना अधिकाऱ्यांच्या लक्षात आली.
त्यांनी तातडीने अग्निशामक दलाला व बँकेच्या अधिकार्यांना याबाबत माहिती दिली. अग्नीशामक दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने आग आटोक्यात आली. या आगीत मोठे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही.
Post a Comment