खा. सुजय विखे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धूसफूस... बेलवंडीतील कार्यक्रमावर बहिष्कार....

अमर छत्तीसे 

श्रीगोंदा :  खासदार डॉ. सुजय विखे पाटील हे  श्रीगोंदा तालुक्याच्या दौर्यावर येत आहेत. पण खा. विखे पाटील यांच्या दौर्यावर बेलवंडी जिल्हा परिषद गटातील प्रमुख कार्यकर्त्यांनी बहिष्कार टाकला आहे. याबाबत समाज माध्यमातून चर्चा चालू आहे. 


खासदार डॉ. सुजय विखे पाटील हे श्रीगोंदा तालुक्याच्या दौर्यावर येत आहेत त्यांची स्वतंत्र यंत्रणा प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आहे. पण या यंत्रणेत विखे यांच्या विरोधात लोकसभेला काम केलेल्यांचाही समावेश आहे. ज्यांनी प्रामाणिक काम केले त्यांना वगळून प्रत्येक गावात दोन गट निर्माण करण्याचे काम स्थानिक यंत्रणेने केले आहे. 

असाच प्रकार बेलवंडी जिल्हा परिषद गटात घडला आहे. बेलवंडी येथील सोसायटीच्या इमारतीचे उद्घाटनचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. पण या कार्यक्रम पत्रिकेत माजी जिल्हा परिषद सदस्य अनुराधा नागवडे व बेलवंडी ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच पवार यांचे कार्यक्रम पत्रिकेत नाव नसल्याने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला असल्याची माहिती काहींनी समाज माध्यमावर पोस्ट टाकून व्हायरल केली आहे.  

संतोष सोनवणे म्हणाले की,  खा. सुजय विखे पाटील यांच्या दौर्यावर गटबाजीचे सावट राहिले आहे. खासदार विखेंची यंत्रणा आ. पाचपुते गटाला दुय्यम वागणूक देेते. हा प्रकार थांबणे गरजेचे आहे.

नगर दक्षिण चे खासदार हे अतिशय कार्यक्षम खासदार आहेत. पण त्यांची श्रीगोंद्यातील  यंत्रणा गटबाजीचे राजकारण करत आहे. मध्यंतरी अपंग व्यक्तींना साहित्य वाटपाचे काम डॉ सुजय विखे पाटील यांनी केले. त्याची मात्यांच्याकडेच दिली नाही ज्यांनी लोकसभेला डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विरोधात काम केले. 

त्यांच्याकडे श्रीगोंदा तालुक्यातील डॉ. सुजय विखे पाटील यांची यंत्रणा सर्व माहिती देते. मग आम्ही फक्त मतदानापुरते घोंगड्या उचलण्याची कामे करायची काय? असा सवाल आढळगाव येथील संतोष सोनवणे यांनी उपस्थित केला आहे

उद्या खा. विखे पाटील यांना तालुक्यातील त्यांच्या यंत्रणे बाबत लेखी तक्रार करणार असल्याचे भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस सतीश काळे यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post