त्या घटनेचा फडणवीस यांच्याकडून निषेध....

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांच्या निवासस्थानी झालेली घटना सर्वथा चुकीची आहे. नेते कुठल्याही पक्षाचे असोत पण त्यांच्या घरांवर अशी आंदोलने करणे याचे अजिबात समर्थन करता येणार नाही. या घटनेचा मी तीव्र निषेध करतो, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून दिली आहे.


एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी केलेल्या आंदोलनाबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेल्या 5 महिन्यांहून अधिक काळपासून एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. त्यांच्या व्यथा, मागण्या योग्यप्रकारे व योग्य व्यासपीठावरच मांडल्या जाव्यात. त्या ऐकून घेतल्या जाव्या, अशी अपेक्षाही व्यक्त करतो, असे त्यांनी ट्विट केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post