अँड.गुणरत्न सदावर्ते यांना अटक...

मुंबई :  एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अँड. गुणरत्न सदावर्ते यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आले आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा त्यांच्यावर नोंदवण्यात आला आहे. 


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर राज्यातील घडामोडी वेगाने घडताना दिसत आहेत. दुपारी झालेल्या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी 107 लोकांना अटक केली आहे. गावदेवी पोलीस ठाण्यामध्ये अँड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या आंदोलनात एक पोलीस अधिकारी जखमी झाला आहे. त्यामुळे अँड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर त्यामुळे आयपीसी कलम 353 (सरकारी कामात अडथळा, 120 B समान हेतू) या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कोणतीही नोटीस न देता मला ताब्यात घेतलं आहे, व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आहे अशी प्रतिक्रिया अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी दिली आहे. मला ताब्यात घेताना कोणत्याही प्रक्रियेचे पालन करण्यात आलं नाही. माझ्या जीवाला काही धोका निर्माण झाला तर त्याला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील जबाबदार असतील असंही ते म्हणाले. 


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post