नाशिक : एक रुपया भरपाई देत.पत्नीला घटस्फोट दाण्याचा प्रकार घडलेसा आहे. हा घटस्फोट मोबाईलवर झाला असून हा निर्णय एका जात पंचायतीत झाला आहे. यामुळे सदर विवाहितेने या विरोधात आता आवाज उठविण्याची निश्चय केला आहे.
पहिल्या पत्नीचा घटस्फोट झाला नसतांना नवर्याने दुसरे लग्न केल्यास तो गुन्हा ठरतो. परंतु हे जात पंचायतीला मान्य नाही. फोनवर घटस्फोट केल्याचा प्रकार सिन्नर (जि. नाशिक ) येथे उघडकीस आला.
सिन्नर येथील एका मुलीचे लोणीतील एका मुलाबरोबर लग्न झाले होते. लग्नानंतर सासरच्या व्यक्तींनी तिचा छळ केला. या छळाला कंटाळून विवाहितेने माहेरी जाणे पसंत केला.
त्यानंतर सासरच्या मंडळींनी लोणी व सिन्नर येथे समाजाची जात पंचायत बसवली. जात पंचायतीने सदर महिलेला न विचारता तिच्या अनुपस्थितीत तिचा घटस्फोट केला. त्यासाठी सासरकडील लोकांनी भरपाई केवळ एक रुपया पंचांकडे दिला.
सदर विवाहितेच्या पतीने आठ दिवसांपूर्वी दुसरे लग्न केल्याने तिला अन्याय असय्य झाला. तिने ही बाब समोर आणण्याचा व न्यायासाठी लढण्याचा निर्णय घेतला आहे.

Post a Comment