मुंबई : प्रार्थनेला माझा विरोध नाही. मात्र मशिदींवरील लागलेले भोंगे खाली उतरावावे लागतील, हा निर्णय सरकारने घ्यावा लागले. निर्णय नाही घेतला तर मशिदींसमोर हनुमान चालीसाचे स्पीकर लावावे. मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महविकास आघाडी सरकारला दिला आहे.
शिवाजी पार्क येथे सुरू असलेल्या गुढीपाडवा मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरला आहे.
राज ठाकरे म्हणाले की, धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे. माझा कोणाच्या प्रार्थनेला विरोध नाही. मात्र तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका. सकाळी पाच वाजल्यापासून त्रास होतो. कोणत्या धर्मात लाऊडस्पीकर लिहिलं आहे.
धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का? बाहेरच्या देशांमध्ये बघा. कुठेही तुम्हाला लाऊडस्पीकर दिसणार नाही. तुमच्या परमेश्वरांशी प्रार्थना करायची असल्यास करा, मात्र घरात असं ते म्हणाले आहेत.

Post a Comment