पारनेर : पारनेर-नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांच्या विशेष प्रयत्नातून पारनेर-नगर मतदार संघातील खालील गावाच्या विविध विकास कामासाठी सामाजिक न्याय विभागा मार्फत एक कोटींचा तर विविध विकास कामासाठी अल्पसंख्यांक विभागा मार्फत एक कोटींचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार निलेश लंके यांनी दिली आहे.
यामध्ये बाबुर्डी घुमट,ता.नगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह बांधणे-२० लक्ष, जखणगाव,ता.नगर येथे मागासवर्गीय वस्ती अंतर्गत रस्ता काँक्रीट करणे-१५ लक्ष.नांदगाव,ता.नगर येथे लोहार वस्ती ते जाधव वस्ती रस्ता काँक्रीट करणे-१५ लक्ष वाडेगव्हाण येथील मागासवर्गीय वस्ती अंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह बांधणे-२० लक्ष.
पळशी येथील मागासवर्गीय वस्ती अंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह बांधणे-१५ लक्ष.सावरगाव येथील मागासवर्गीय वस्ती अंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह बांधणे-१५ लक्ष असा वरील ६ गावामधील दलित वस्ती अंतर्गत विविध विकास कामासाठी सामाजिक न्याय विभागा अंतर्गत आमदार लोकनेते निलेश लंके यांच्या वतीने १ कोटी निधी उपलब्ध करून दिला आहे.
पारनेर-नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांच्या विशेष प्रयत्नातून पारनेर-नगर मतदार संघातील गावाच्या विविध विकास कामासाठी अल्पसंख्यांक विभागा मार्फत १ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.यामध्ये टाकळी खातगाव (ता.नगर) येथे शादिखाना बांधणे-१० लक्ष
अकोळनेर येथे कब्रस्थान मध्ये विविध विकास काम करणे-१० लक्ष. चास येथे कब्रस्थान मध्ये विविध विकास काम करणे-१० लक्ष.सारोळा कासार,ता.नगर येथे कब्रस्थान मध्ये विविध विकास काम करणे-१० लक्ष.कामरगाव,ता.नगर येथे कब्रस्थान मध्ये विविध विकास काम करणे-१० लक्ष
खडकी,ता.नगर येथे दावल मलिक कब्रस्थान मध्ये विविध विकास काम करणे-१० लक्ष मौजे.रांजणगाव मशीद,ता.पारनेर येथे कब्रस्थान मध्ये विविध विकास काम करणे-१० लक्ष जामगाव,ता.पारनेर येथे कब्रस्थान मध्ये विविध विकास काम करणे-१० लक्ष
ढोकी,ता.पारनेर येथे कब्रस्थान मध्ये विविध विकास काम करणे-१० लक्ष.हिवरे कोरडा,ता.पारनेर येथे कब्रस्थान मध्ये विविध विकास काम करणे-१०. लक्ष अशा वरील १० गावामधील कब्रस्थान व शादिखाना बांधकाम करणे अशा विविध विकास कामासाठी अल्पसंख्यांक विभागा अंतर्गत आमदार लोकनेते निलेश लंके यांच्या वतीने भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Post a Comment