नगर : कोर्टाच्या आदेशानुसार मशिदींवरील भोग्यांवर करवाई करा अन्यथा मनसे पालकमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी त्यांच्या गाडीसमोर हनुमान चालीसा लावणार असा इशारा मनसेचे नितीन भुतारे यांनी दिला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंगे खाली उतरवा अन्यथा त्याच्या दुप्पट आवाजात मनसेचे कार्यकर्ते स्पीकर वर हनुमान चालीसा लावणार असा इशारा राज्य सरकारला दिला.
त्याचे पडसाद नगर जिल्ह्यात उमटवायला सुरवात झाली आहे. मनसेचे नितीन भुतारे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनाप्रसिद्धी पत्रकाद्वारे थेट इशारा दिला आहे. त्यामुळे येणारा पालकमंत्र्यांचा दौरा हा वादाचा विषय ठरणार आहे.
मनसे सरकारमधील मंत्र्यांना घेरण्याचा तयारीत आहे. कोर्टाच्या आदेशानुसार मशिदींवरील भोंग्यावर करवाई करण्याच्या अधिकार हा सरकार ला असुन पालकमंत्री या नात्याने आपण जिल्हा प्रशासनाचा तसे आदेश द्यावेत अशी मागणी मनसेचे नितीन भुतारे यांनी पालकमंत्र्यांना प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
त्यामुळे पोलीस प्रशासनाला यामुळे पालकमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी सतर्क राहण्याची गरज आहे. सरकार राज्यभर मनसेने लावलेल्या हनुमान चालीसेवर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे न्याय हा सर्वांना सारखा असावा मशिदींवरील भोंग्यावर सरकारने करवाई करणे गरजेचे आहे. असे या वेळी मनसेचे नितीन भुतारे म्हणाले.
पालकमंत्र्यांचा दौरा हा हनुमान चालीसा मुळे गाजणार आहे. मनसे रस्त्यावर उतरून पालकमंत्र्यांना आव्हान देणार आहे, असेही भुतारे यांनी म्हटले आहे.

Post a Comment