पारनेर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांचा सोमवारी आयोजित केलेले जनता दरबारामध्ये विविध खात्याअंतर्गत ३५६ प्रश्न मार्गी लागले आहेत.दोन वर्षाच्या कोरोना महामारी नंतर निर्बंध उठविल्या नंतर पहिल्यांदाच सोमवारी चार एप्रिलला पारनेर येथील आंबेडकर सांस्कृतीक भवनात सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना बरोबर घेत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.
या जनता दरबारात महसूल पोलिस प्रशासन आरोग्य, जलसंधारण, पंचायत समिती भुमिअभिलेख सार्वजनिक बांधकाम महावितरण नगरपंचायत इतर विभागाच्या तक्रार निवारण मोठ्या प्रमाणावर करण्यात आले.
पारनेर-नगर विधानसभा मतदार संघाचे विधानसभा सदस्य आमदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अधिकारी व नागरिक यांच्यात समन्वय साधत मूलभूत प्रश्न मार्गी लागण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जनता दरबाराचे आयोजन करण्यात येत होते.
परंतु गेले काही महिन्यांपासून कोरोना या जैविक विषाणूच्या संसर्गामुळे हा जनता दरबार बंद पडला होता. यात आमदार लंके यांनी अधिकार्यांसमवेत घेतलेल्या जनता दरबारात ३५६ प्रकरणांचे निवारण करण्यात आले.
जनता दरबारात आमदार निलेश लंके यांनी सर्व तक्रारीमध्ये स्वतः लक्ष घातले या वेळी त्यांच्या समवेत तहसीलदार शिवकुमार अवलकंठे, नगरपंचायत मुख्याधीकारी डॉ . कुमावत , डॉक्टर प्रकाश लाळगे , शामराव मुळे , भाऊसाहेब पवार , एम व्ही भोसले , आहिरे साहेब ,सुरेश भागवत , सुहास साळवे , गणेश औटी ,अनिल शिंदे , गणेश आढारी , प्रकाश तिपुळे , आडभाई साहेब , पराग भोपळे या प्रशासकीय अधिकाऱ्यां सह सुदामराव पवार जितेश सरडे, खंडू भुकन , राहुल झावरे , पारनेर नगरपंचायतचे नगराध्यक्ष विजयराव औटी, उपनगराध्यक्षा सौ. सुरेखा भालेकर , राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर , नगरसेवक नितीन अडसुळ , आशोक चेडे , भुषण शेलार , डॉ .सचिन औटी , डॉ.कावरे , योगेश मते,विजय भास्कर औटी , हिमानी नगरे , सुभाष शिंदे, श्रीकांत चौरे , विजय डोळ बाळासाहेब पुंडे , शरदराव झावरे , बाळासाहेब खिलारी , दगदिश गागरे , उमाताई बोरुडे , दिपाली औटी , दौलत गांगड , अजिंक्य गवळी , निरु कुरेशी , किरण पानमंद, श्रीकांत डेरे , शिक्षक नेते चंद्रकांत मोढवे , परशुराम फंड, संदीप चौधरी, यांच्या सह निलेश लंके प्रतिष्ठान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधीकारी सदस्य, सर्व विभागांचे अधिकारी, सर्कल, तलाठी, ग्रामसेवक व आपल्या तक्रारी घेऊन आलेले अनेक तरुण, वृध्द व सर्वसामान्य जनता या वेळी या जनता दरबारात उपस्थित होते .
शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन येथे जनता दरबार भरविण्यात आला होता. यात शेकडो तक्रार अर्ज दाखल झाले व प्रत्येक अर्जाचे संबंधित शासकीय अधिकाऱ्यां समवेत सोडवणूक करण्याचा प्रयत्न आमदार लंके यांनी केला.त्यातील अनेक प्रकरणे जनता दरबारात मार्गी लावले.
महसूल विभागाच्या अंतर्गत प्रलंबित 7/12 नोंदी व दुरूस्ती शिधापत्रिका, फेरफार दुरूस्ती सह रस्ते व जमीन वाटपा संदर्भात गावागावात दरबारातील तक्रारींचा तपशील तहसील कार्यालयातील प्रकरणांपैकी सर्व प्रकरणांवर कार्यवाही झाली आहे.
लवकरच हे सर्व प्रकरणे मार्गी लागतील असे तहसिलदार शिवकुमार आवळकंठे यांनी सांगीतले. कोरोना महामारी मुळे गेल्या दोन वर्षांमध्ये जनता दरबार बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात तक्रारी असुन याबाबत तक्रारींचा पाऊस या जनता दरबारात पडला.
पारनेर पंचायत समितीसह पाटबंधारे विभाग, महावितरण, ग्रामपंचायत आरोग्य विभाग, पोलीस या विभागाच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात लेखी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्यानुसार तातडीने संबंधित विभागाच्या अधिकारांना सांगुन जास्तीत तक्रारींचा निपटारा या जनता दरबारात करण्यात आला.
महसूल विभागाच्या वतीने पारदर्शक कारभार येण्यासाठी ऑनलाईन संगणकीय 7/12 तयार करण्यात आला आहे. परंतु गावनिहाय 7/12 ची नोंद करताना कामगार तलाठ्यांकडुन नाव दुरुस्ती व क्षेत्र दुरुस्तीची अनेक तक्रारी प्रलंबित आहे.
त्यामुळे अनेक नोंदी प्रलंबित असून या ऑनलाईन 7/12 मध्ये मोठ्या प्रमाणात अनागोंदी असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. तर दुसरीकडे नविन रेशनकार्ड सह धान्य मिळत नसल्याने तक्रारी करण्यात आल्या आहेत.
गुढीपाडव्याच्या दिवशी बाबळवाडा येथील रहिवाशी असलेल्या मारुती दादाभाऊ जगदाळे यांच्या घराला आग लागल्याने संसारपयोगी इतर जीवनावश्यक सर्व वस्तू या आगीत जळून खाक झाल्या. त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रवक्ते जितेंद्र सरडे यांनी ही बाब आमदार निलेश लंके यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी तातडीने दहा हजार रुपयाची मदत प्रतिष्ठानच्या वतीने सोमवारी दिली आहे.
तर निलेश लंके महिला संघटनेच्या वतीने संसारोपयोगी वस्तु देण्यात येणार आहे. तसेच महसूल प्रशासनाच्या वतीने सुद्धा या कुटुंबियांना मदत केली जाणार असून ग्रामस्थांनी मदत करावी असे आव्हान सुद्धा आमदार निलेश लंके यांनी केली आहे.
नगर तालुक्यातील चास येथील ओम पोपट भोर याच्या डोक्यावरील पालकाचे छत्र हरपले असून आमदार निलेश लंके यांच्या कडे त्याने नगरच्या दौऱ्यात सायकलची मागणी केली.ही मागणी तातडीने सोमवारी जनता दरबारामध्ये या सायकलची तातडीने भेट दिली आहे.

Post a Comment