पारनेर : विद्यार्थ्यांची असलेली खेळ भावना टिकून राहिल्यास नक्कीच चांगले खेळाडू निर्माण होतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पारंपारिक सण-उत्सव सकारात्मक भावनेतून साजरे करणे आवश्यक असून आपली खेळाप्रती असलेली भावना नेहमी सकारात्मक ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा व आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक पंच असलेल्या राजेश्वरी कोठावळे यांनी केले.
समतेची, न्यायाची, प्रेरणेची, सामाजिक गुढी उभारत विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक भावना निर्माण होण्यासाठी नेहमी कार्य करणाऱ्या अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा व आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक पंच असलेल्या राजेश्वरी कोठावळे यांनी विद्यार्थ्यांसमवेत गुढीपाडवा हा सण उत्साहात साजरा केला. यावेळी आपल्या विद्यार्थ्यांना त्यांनी हिंदू नववर्षाच्या व गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.
दरम्यान गुढीपाडवा हा सण विद्यार्थ्यांच्या समवेत साजरा करून समाजामध्ये एक सकारात्मक दृष्टिकोन राजेश्वरी कोठावळे यांनी निर्माण केला आहे. राजेश्वरी कोठावळे विद्यार्थ्यां समवेत नेहमी सण-उत्सव साजरे करून प्रेरणादायी काम करत असतात.
विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करून चांगले राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडवण्यासाठी त्या काम करत आहेत. यावेळी खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकही उपस्थित होते.

Post a Comment