नवी दिल्ली : पेट्रोल व डिझेलच्या किमतींमध्ये वाढ सुरूच आहे. आज पुन्हा एकदा इंधनाच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. गेल्या 22 मार्चपासून तब्बल दहा वेळा पेट्रोल व डिझेलचे भाव वाढले आहेत.
आज पेट्रोल व डिझेलच्या दरात लिटरमागे प्रत्येकी 80 पैशांची वाढ झाली आहे. शुक्रवारी इंधनाचे दर स्थिर होते. त्यामध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. मात्र शनिवारी आज पुन्हा एकदा इंधनाच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे.
नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.61 रुपयांवर पोहोचला आहे. तर डिझेल 93.87 रुपये प्रति लिटर झाले आहे. मुंबईत पेट्रोलचा भाव प्रति लिटर 117.57 रुपयांवर पोहोचला आहे. तर डिझेलचा दर वाढून 101.79 रुपये झाला आहे.
देशभरातील जवळपास सर्वच महानगरांमध्ये पेट्रोलच्या किमतीने शंभरचा टप्पा पार केला आहे. गेल्या बारा दिवसांमध्ये पेट्रोलच्या दरामध्ये लिटरमागे सात रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली आहे.
Post a Comment