नगर : जिल्हा परिषद प्रशासनाने बदल केला असून येत्या सोमवार (ता. चार) पासून जिल्ह्यातील शाळा सकाळच्या सत्रात भरणार आहेत.
याबाबतचा कार्यालयीन आदेश जिल्हातील सर्व गटशिक्षण अधिकाऱ्यांना तसेच नगर पालिका, महापालिकाच्या शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकाऱ्यांना त्यांनी काढला आहे.
सध्या उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने पूर्वी प्रमाणे एप्रिल महिन्यात शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याचा निर्णय तातडीने घ्यावा अशी मागणी गुरुवारी (दि. ३१) अहमदनगर जिल्हा शिक्षक समन्वय समितीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांच्या कडे केली होती. यावेळी शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याबाबत लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी समितीला दिले.
त्यानुसार शुक्रवारी (ता.एक) जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सोमवार (ता. चार) पासून शाळा सकाळी ७ ते दुपारी १२.३० यावेळात भरणार आहेत.
हा निर्णय प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेतला आहे. परंतु शिक्षकांनी शाळेत उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
Post a Comment