आढळगावातील दोन सेवा संस्थेच्या निवडणुकीसाठी तब्बल ९३ उमेदवारी अर्ज दाखल...

अमर छत्तीसे 

श्रीगोंदा : राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या व पूर्व भागातील सर्वात मोठे गाव म्हणून आढळगावला ओळखले जाते. या गावातील दोन सेवा सोसायटीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तब्बल ९३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.


उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी २६ एप्रिलपर्यंत अवधी आहे तर सात मेला प्रत्यक्ष मतदान होणार आहे. राजकीय दृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या आढळगावमध्ये आढळगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटी व सिध्देश्वर विविध कार्यकारी सेवा सोसायटी अशा दोन संस्था आहेत. 

या संस्थेची प्रत्यक्ष निवडणूक सात मेला होत आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटचा दिवस होता. त्यामुळे आज अखेर आढळगाव सेवा सोसायटीच्या १३जागांसाठी ५०अर्ज दाखल झाले आहेत, तर सिध्देश्वर सेवा सोसायटीच्या १३ जागांसाठी ४३अर्ज दाखल झाले आहेत. 


या निवडणुकीत आमदार बबनराव पाचपुते गट व माजी आमदार राहुल जगताप गटात समोरासमोर लढत होणार आहे. आमदार बबनराव पाचपुते गटाचे तरी माघारीसाठी तब्बल १८ दिवसांचा कालावधी असल्यामुळे काही जागा बिनविरोध होतात का हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post