अमर छत्तीसे
श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुका लिंबाच्या बाजारभावाला राज्यात दिशा देण्याचे काम करतो. मागील काही दिवस लिंबाच्या भावाने शेतकर्यांना हसवले. मात्र आज भावातील घसरणीने रडवले. लिंबाला अक्षरक्षः लुटले आहे तब्बल लिंबाच्या भावात ६०टक्क्यांची घसरण झाली आहे.
बाजारभाव घसरल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सूर उमटला आहे. अचानक वाढलेले भाव कमी कसे झाले असा प्रश्न लिंबू उत्पादकांना पडला आहे.
श्रीगोंदा तालुका हा लिंबाचे आगार म्हणून ओळखला जातो. या तालुक्यातील शेती घोड व कुकडी धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे. घोड पट्यात लिंबू बागा कमी आहेत. मात्र कुकडी पट्यात मोठ्या प्रमाणात लिंबू बागा आहेत. त्यात कुकडीच्या पाण्यावरून राजकीय श्रेय वाद रंगला आहे.
शेतकर्यांनी कुकडीच्या आवर्तनाकडे डोळे लावले आहे. त्याच पाण्यावर आपली लिंबाची बाग जगविण्यासाठी शेतकरी धडपड करत असताना काल २००रुपये पार केले. लिंबू आज 70 ते 120 रुपयांपर्यंत आले आहे.
नेमका भाव कशामुळे कमी झाला याचे उत्तर गुलदस्त्यात आहे. पण एखाद्या शेती पिकाचा भाव १०रुपये ते २०रुपयांनी कमी होतात पण येथे चक्क १००रुपयांनी भाव कमी झाला आहे. याचे नेमके कारण समजू शकले नाही.
आजच्या बाजारभावाने शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. एकंदरीत आज लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना अक्षरक्षः लुटले असल्याची प्रतिक्रिया लिंबु उत्पादक शेतकरी संतोष सोनवणे यांनी दिली.
ग्रामीण भागात तर काही महाभागांनी ७०रुपयांपासून ते ९०रुपयांपर्यत लिंबू खरेदी करुन लूट केली आहे. परराज्यात लिंबाला मागणी असताना भाव का उतरवला हा संशोधनाचा विषय आहे असेही संतोष सोनवणे म्हणाले.
कांद्या प्रमाणे लिंबाचे झालेले आहे. आवक वाढावी, यासाठी लिंबाच्या भावात विक्रमी वाढ केली. आवक वाढल्याचे लक्षात येताच भाव पाडण्यात आले.

Post a Comment