अमर छत्तीसे
श्रीगोंदा : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पदाधिकार्यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपला असल्याने जिल्हा परिषदेवर प्रशासकराज आले आहे. मात्र रविवारी दुपारी पासून समाजमाध्यमांवर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याचा संदेश व्हायरल होत आहे. त्यामुळे अनेकात संभ्रम निर्माण झाला आहे.
सध्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची मुदत संपली असल्याने प्रशासकराज आले आहे. सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणावर याचिका दाखल झालेली आहे. त्यावर अद्याप अंतिम निर्णय झाला नाही.
त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने ही निवडणूक कार्यक्रमा संदर्भात निर्णय घेतला नाही. या अगोदर ओबीसी आरक्षण मगच निवडणुका अशी भूमिका काही राजकीय पक्षांनी घेतली आहे.
त्यामुळे अद्याप निवडणुकीसंदर्भात कोणताही निर्णय झाला नसताना आज समाजमाध्यमांवर निवडणूक कार्यक्रम अगदी दिनांक निहाय प्रसिद्ध केला आहे. या संदेशाने सगळीकडे संभ्रम निर्माण झाला आहे.

Post a Comment