संजय राऊत यांना अखेर अटक...

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांना अखेर ईडीने अटक केली आहे.  रविवारी सकाळीच ईडीचे पथक संजय राऊत  यांच्या घरी पोहोचले होते. साडे नऊ तास चौकशी केल्यानंतर ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतले व त्यांना ईडी कार्यालयात घेऊन आले होते. त्यानंतर त्यांना अटक केली.


संजय राऊत यांना आता आज सकाळी जे. जे रुग्णालयात तपासणीसाठी नेले जाणार आहे. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे. आज संजय राऊत यांच्या निवासस्थानी ईडीला 11 लाख 50 हजार रुपये मिळाले आहेत.  

याआधी संजय राऊत यांना ईडीने चौकशीसाठी तीन वेळा समन्स बजावले होते. मात्र ते हजर राहिले नव्हते. त्यानंतर रविवारी सकाळी ईडी अधिकारी थेट त्यांच्या घरी पोहोचले होते. दुपारी ताब्यात घेतल्यानंतर जवळपास 8 तासानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.

ईडीकडून केले गेलेले आरोप खोटे असल्याचे सुनिल राऊत यांनी म्हटले आहे. आम्ही घाबरणार नाही. भाजप संजय राऊत यांना घाबरली आहे असा आरोप देखील त्यांनी केला आहे.

दुसरीकडे संजय राऊत यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 504, 506 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.  

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post