एसटी बँक फोडण्याचा प्रयत्न...

नगर : राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचार्यांच्या पगारासाठी एसटी को ऑपरेवटीव्ह बँक सुरु करण्यात आलेली आहे. या बँकेची माळीवाडा शाखा फोडण्याचा प्रयत्न रविवार (ता.31)ला झाला.


नगर जिल्ह्यात एसटी कामगारांचे पगार होणाऱ्या दोन बँका आहेत. त्यातील एक बँक माळीवाडा बसस्थानक परिसरात तर एक श्रीरामपूर येथे आहे. नगर शहरातील शाखेतून सुमारे 3500 कर्मचाऱ्यांचे पगार जमा होतात. तसेच लहान कर्ज, मोठे कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्जे दिली जातात. 

या शाखेतून रोजचा व्यवहार मोठ्या प्रमाणात होत आहे. हीच शाखा फोडण्याचा प्रयत्न रविवारी रात्री केला. परंतु या शाखेला दोन दरवाजे होते. त्यातील एक दरवाजाचे कुलूप तोडण्यात चोरट्यांना अपयश आले. 

त्यानंतर ते निघून गेले. ही बाब आज कर्मचार्यांच्या लक्षात आली. त्यानंतर कोतवाली पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. 

या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी दुपारपर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. येथे दोन दरवाजे असल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. बसस्थानक परिसरात हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात.आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post