दीड कोटींचा औषधसाठा जप्त...

राहुरी : शहरातील एका गोदामावर पोलिस पथकाने छापा घालून प्रतिबंधक औषधांचा मोठा साठा जप्त केला आहे. या औषधांची शासकीय किंमत अंदाजे ३५ लाख असून बाजारमूल्य सुमारे दीड कोटीचे पोलिस सूत्रांनी सांगितले.    


या कार्यवाहीप्रकरणी पोलीस पथकाने जमील महेबूब शेख (वय ३५, रा. राहुरी, व अख्तर चांद शेख (वय२१, रा राहुरी) यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या विरुद्ध औषध निरिक्षक ज्ञानेश्वर दरंदले यांच्या फिर्यादी वरून एनडीपीएस कायदा (गुंगी कारक औषधे द्रव्य, व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५) या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.                             

बुधवारी दुपारी सव्वातीन वाजता राहुरी शहरातील बारागांव नांदूर येथील रोडलगतच असलेल्या एका मंगल कार्यालय शेजारील असलेल्या एका पत्राच्या गाळ्यावर पोलीस पथकाने छापा टाकला.  यावेळी गर्भपात,नशा असणाऱ्या गोळ्यांसह अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. 

पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, राहुरी तालुका कर्तव्य दक्ष पोलीस निरिक्षक प्रताप दराडे, औषधड्रग्ज इन्स्पेक्टर ज्ञानेश्वर दरंदले यांच्या पथकाने छापा घालून दीड कोटींचा औषधसाठा जप्त केला. 

विशेषतः म्हणजे आरोपींना हा औषधांचा साठा इतरत्र हलवायचा होता,त्यासाठी आरोपी अख्तर याने गाळा उघडण्याची वेळ आणि पोलीसांची पथकाची वेळ एकच होऊन हि मोठी कार्यवाही यशस्वी झाली.          

आरोपीने विविध औषधांच्या दुकानांमध्ये प्रतिबंधक औषधे विक्री साठी पुरविल्याचा संशय असून,त्यांनी कोणकोणत्या औषधांच्या दुकानांमध्ये प्रतिबंधक औषधे दिली आहेत


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post