नगर : अवैधरित्या दारू विक्री करण्यासाठी परवानगी देऊन महिना 30 हजार रूपयांचा हप्ता घेणार्या पोलीस अंमलदारासह खासगी व्यक्तीला लाचलुचपत विभागाच्या नाशिक पथकाने अटक केली आहे.
तोफखाना पोलिस ठाण्यातीेल अंमलदार शैलेश गोमसाळे व खासगी व्यक्ती वैभव साळुंके (वय 35 रा. नगर) अशी त्यांची नावे आहेत.
मंगळवारी पाईपलाईन रस्त्यावरील एकविरा चौक परिसरात ही कारवाई करण्यात आली. तोफखाना हद्दीतील तक्रारदार यांना विना परवाना दारू विक्री करण्याची परवानगी देवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात गोमसाळे याने खासगी व्यक्ती साळुंके यांच्यामार्फत तक्रारदाराकडे 30 हजार रूपयांची मागणी केली होती.
तक्रारदार यांनी नाशिक लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती.दिलेल्या तक्रारीवरून 21 जुलै रोजी लाच मागणी पडताळणी दरम्यान लाच मागितल्याचे सिध्द झाले होती.
दरम्यान मंगळवार, 2 ऑगस्ट रोजी एकविरा चौक परिसरातील सिटी स्टोअरजवळ खासगी व्यक्ती साळुंके याने गोमसाळे याच्यावतीने तक्रारदार यांच्याकडून 30 हजार रूपयांची रक्कम स्वीकारताना पथकाने रंगेहाथ पकडले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक साधना इंगळे, पोलीस अंमलदार सचिन गोसावी, प्रफुल्ल माळी, चंद्रशेखर मोरे, शरद हेंबाडे, संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने केली.
त्यांच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. त्यामुळे असे प्रकार इतर पोलिस ठाण्यात तर होत नाही ना अशा शंका आता उपस्थित होऊ लागल्या आहेत.
Post a Comment