कांद्याला इतकाच भाव...

अकोले : येथील उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 2237कांदा गोण्यांची आवक झाली. तर उच्चांकी 1600 रुपयांचा भाव मिळाला.  


आज झालेल्या लिलावात एक नंबर कांद्यास एक नंबर : 1250 ते 1600, दोन नंबर 1001 ते 1251, तीन नंबर 700ते 1000, गोल्टी कांदा : 451 ते 800, खाद 150 ते 500 याप्रमाणे बाजारभाव मिळाले आहेत.

अकोले बाजार आवारात रविवार, मंगळवार व गुरुवारया तीनदिवशी लिलाव होतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा योग्य बाजारभाव मिळावा यासाठी येथेच आणावा. 

तत्पूर्वी लिलाव वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने वजन करण्यासाठी लिलावाच्या आदल्या दिवशी सकाळी १२ ते ७ वाजेपर्यंत व लिलावाच्या दिवशी सकाळी १२ ते ३ वाजेपर्यंत ५० किलो बारदान गोणीत, वाळवून व निवड करुन विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती परबत नाईकवाडी, उपसभापती भरत देशमाने, संचालक व सचिव अरुण आभाळे यांनी केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post