गिते यांच्या बदलीने अहमदनगरमधील एसटीच्या चाकाला ब्रेक...


सचिन पाटील

नगर : राज्य परिवहन महामंडळाच्या अहमदनगर विभागाचे विभाग नियंत्रक विजय गिते यांची धुळे येथे बदली झालेली आहे. त्यामुळे अहमगनगरमधील एसटीला ब्रेक लागला असून धुळ्यातील बसेस आता गतीमान होऊन उत्पन्न वाढीत आघाडी घेईल, असे मतं कर्मचार्यांमधून व्यक्त केले जात आहे. सर्वांचा मानसन्मान ठेऊन सदैव सर्वांना मदतीसाठी धावणारा अधिकारी बदलून जात असल्याने कर्मचारी नाराज झालेले आहेत.


विभाग नियंत्रक विजय गिते यांनी नगर जिल्ह्यात विभाग नियंत्रक म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर अहमदनगर विभागाने राज्यात उत्पन्न वाढीत आघाडी घेतली आहे. गिते यांनी नगर जिल्ह्यातील सर्वच आगारांचा कारभाराचा आढावा घेऊन उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न सुरु केले.

ज्या बंद झालेल्या फेर्या होत्या. त्या पुन्हा सुरु करण्याच्या सूचना दिल्या. बस फक्त सुरु न करता त्यांना उत्पन्न कसे वाढेल या दृष्टीने नियोजन करण्यावर त्यांनी मार्गदर्शनही केले. आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूरला जाणार्या भाविकांची सोय होण्याच्या दृष्टीने त्यांनी उत्कृष्ट नियोजन केले. 


त्यामुळे भाविकांची सोय होऊन दरवर्षाची एसटीच्या उत्पन्नात भक पडली. तारकपूरसह जिल्ह्यातील इतर आगारातून नवीन बस सुरु करण्यावर त्यांनी विशेष भर दिला तो अहमदनगर विभागाला फायदेशीर ठरला.

महिलांसाठी स्वतंत्र बस सुरु करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. या बसला महिला प्रवाशांचा चांगला प्रतिसादही लाभला. त्यानंतर शहरातील श्रीराम चौकातून पुण्यासाठी स्वतंत्र बस सुरु करून सावेडीसह उपनगरातील प्रवाशांची सोय केली.

यासह गिते यांनी अनेक उपक्रम राबवून एसटीच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना जिल्ह्यातील सर्व एसटी कर्मचार्यांना चांगली साथ दिली. त्यामुळेच नगर जिल्ह्यातील एसटीच्या विभागाने राज्यात लौकीक मिळविला आहे. ही उल्लेखनिय कामगिरी करताना त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन काम केलेले आहे. त्याचे चांगले फलित दिसून येत आहे. 

प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेऊन वयोवृध्द कर्मचारी व अधिकार्यांसह सर्वांशीच आदराने बोलून प्रत्येकाचा सन्मान ठेऊन ते वागत राहिल्याने सर्वांच्याच मनात त्यांनी घर केलेले आहे. त्यांच्या बदलीमुळे झाल्यामुळे कर्मचारी अस्वस्थ झालेले आहे. असा कर्तव्य दक्ष अधिकारी जिल्ह्यासाठी आणखी काही दिवस हवा होता, अशी प्रतिक्रिया एसटीच्या वर्तुळातून उमटत आहे.


अहमदनगर विभागातीलसकर्मचारी गिते यांच्या बदलीने कर्मचारी नाराज झालेले असून धुळे विभागातील कर्मचारी मात्र आनंदी झालेले आहेत. गिते यांच्यामुळे आमच्या विभागाचे नाव राज्यात पोहचण्यास त्यांचे मार्गदर्शन चांगले मिळेल, अशी आशा त्यांना लागलेली आहे. अशा कर्तव्यदक्ष, सर्वांचा मान सन्मान करणारा व नम्र अधिकारी धुळ्याला लाभल्याने कर्मचार्यांचे चेहरे आनंदी झालेले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post