नगर : शहरात सलग दुसर्या दिवशी रात्री झालेल्या पावसामुळे नगर कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग हा बंद झाला
होता. आता तो खुला झाला आहे.
सीना नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने दोन्ही बाजूच्या रस्त्याने होणारी वाहतूक ही बंद झालेली आहे. पुलावरचे पाणी पाहण्यासाठी नागरिक गर्दी केली. सकाळी शाळेत विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी आलेले पालक मुलांना परत घरी घेऊन जात आहेत. या पूर परिस्थितीमुळे अनेक नोकरदारांनी कामावर जाणे टाळले. काहींना दुसर्या मार्गे शहरात यावे लागले.
नगर-मनमाड राज्य महामार्गावरील संजोग हॉटेल परिसरात रस्त्यावर पाणी तुंबल्याने या रस्त्यावरून वाहतूक वनवे करण्यात आली आहे.
सीना नदीला महापूर नगर-कल्याण रोड संपर्क तुटला रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक खोळंबली नागरिकांना जाण्या येण्यास अडथळा निर्माण झाला आहे.
Post a Comment