नेवासा : नेवासा पंचायत समितीचे बालविकास प्रकल्प अधिकारी ४५ हजाररूपये स्वीकारण्याची तयारी दाखविल्याप्रकरणी नेवासा पंचायत अधिकाऱ्याविरूध्द नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सोपान सदाशिव ढाकणे (वय ३४) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. लाचलुचपत विभागाने त्याला अटक केली आहे. नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
नेवासा तालुक्यातील रस्तापूर येथील तक्रारदाराचे चारचाकी वाहन हे भाडेतत्वावर नेवासे पंचायत समितीचे बालविकास प्रकल्पअधिकारी
यांच्याकडे लावण्यात आले होते. सदर वाहनाचे बिल एक लाख १४ हजार २६९ हे मंजूर करून त्याचा चेक तक्रारदार यांचे बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी तक्रारदार यांना दिला.
त्या मोबदल्यात ढाकणे यांनी तक्रारदार यांच्याकडे ५० हजार रूपयांची मागणी करून २३ जून, २०२२ ला केलेल्या लाच मागणी पडताळणीमध्ये ढाकणे यांनी पंचासमक्ष ४५ हजार रूपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली म्हणून आज त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
Post a Comment