मुंबई ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आजच्या सर्व प्रशासकिय बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. सततचे अतिव्यस्त दौरे व पहाटे पर्यंतच्या सभांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थकवा जाणवत आहे. त्यामुळे, डाॅक्टरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सक्त आरामाचा सल्ला दिला आहे. याच कारणामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एक दिवसाच्या सर्व प्रशासकिय बैठका रद्द केल्या आहेत.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन आता जवळपास महिना उलटून गेला आहे. मात्र, राज्यात सध्या फक्त एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोनच मंत्री आहे. अजूनही राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार पार पडला नसल्याने दोनच मंत्री संपूर्ण कारभार सांभाळत आहेत.
अशात राज्यातील पावसामुळे पूरस्थिती आणि सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जात सभा घेत आहेत, तसंच त्या भागातील आढावा घेत अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची पाहणी करत आहेत.
यासोबत आमदारांच्या बंडखोरीनंतर आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यभरातील शिवसैनिकांसोबत संवाद साधत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे हे दौरे राजकीय दृष्टीकोनातूनही महत्त्वाचे आहेत. मात्र, आता सततच्या दौऱ्यामुळे शिंदे यांना थकवा जाणवत आहे.
Post a Comment