नगर ः गेल्या अनेक वर्षांपासून शेंडी (ता. नगर) येथील प्रिती वसंत शिंदे यांचे सामाजिक काम सुरु आहे. या कामाची दखल घेऊन त्यांना पंचायत समितीसाठी उमेदवारी देणे गरजेचे आहे, असे मत सर्वसामान्यांमधून व्यक्त केले जात आहे. त्यांच्यामुळे त्या गणाचा विकास होऊन तालुक्याच्या लौकीकात भर पडेल असे मत व्यक्त केले जात आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रिती शिंदे यांचे शेंडीसह तालुक्यात सामाजिक कामे सुरु आहेत. या सामाजिक कामातून त्यांचा जनतेची थेट संपर्क येत आहे. त्यामुळे त्यांना तालुक्यातील प्रश्नांची चांगली माहिती झालेली आहे. ते सो़डविण्यासाठी सध्या त्या नेहमीच प्रयत्न करीत असतात. त्यांच्या या प्रयत्नांना यश येत आहे.
तालुक्यातील पिंपळगाव उज्जैनी, खांडके, रांजणी, ससेवाडी, देवगाव आदी गावांमध्ये त्यांच्या कार्याचे नेहमीच कौतुक केले जाते. प्रिती शिंदे यांच्यासह त्यांचे पती वसंत शिंदे यांचेही तालुक्यात चांगले काम आहे. सध्या शिंदे यंनी भाजप दिव्यांग विकास आघाडीतर्फे दिव्यांगासाठी तालुक्यात मोठे काम केलेले आहे.
त्यांच्या या कामामुळे तालुक्यातील दिव्यांगांना मोठा आधार झालेला आहे. तसेच दिव्यांगाचे प्रश्न सोडविण्यासाठी शिंदे प्रयत्नशील असतात. त्यांच्या या प्रयत्नांना प्रिती शिंदे यांची मोलाची साथ असते. त्याचा परिणाम चांगला होत आहे. दिव्यांगाची प्रश्न सुटण्यास मदत त्यामुळे मदत होत आहे.
या शिंदे दाम्पत्याच्या कार्याची दखल भाजपाने घेऊन त्यांना आगामी पंचायत समितीच्या निवडणुकीत तालुक्यातून उमेदवारी द्यावी, अशी मागणी सर्वसामान्यांसह दिव्यांग मतदारांमधून होत आहे.
त्या पंचायत समिती सदस्य झाल्या तर त्या गटाचा विकास होऊन सर्वसामान्यांना न्याय मिळणार आहे. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठांनी पंचायत समितीची उमेदवारी देताना सर्वसामान्य कुटुंबातील शिंदे दाम्पत्याला उमेदवारी द्यावी, अशी मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे.
संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून वसंत शिंदे यांचा गावा-गावातील प्रत्येक घराघऱात संपर्क वाढलेला आहे. वसंत शिंदे हे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे अनेक वर्षांपासून एक निष्ठ कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षनिष्ठेची पावती म्हणून त्यांच्या सौभाग्यवतींना पंचायत समितीच्या सध्या च्या शेडी गणाच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी मिळावी. ही सर्वसामान्यांमधून मागणी होत आहे.
Post a Comment