मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शुक्रवारी संध्याकाळी राजभवानावर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपकडून आठ तर शिंदे गटाकडून सात जण शपथ घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावरुन विरोधकांकडून नव्या सरकारवर ताशेरे ओढले जात आहेत. सत्ता स्थापन झाल्यानंतर पहिल्या आठवड्यातच मंत्रिमंडळ विस्तार होणे अपेक्षित होते. परंतु चार आठवडे झाले तरी विस्तार होत नाही त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात नेमकी अडचण काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सहा तारखेला राज्यपालांचा नियोजित दिल्ली दौरा आहे. तर सात तारखेला निती आयोगाची बैठक आहे, त्यामध्ये सहभागी होण्यासाठी एकनाथ शिंदे यांना दिल्लीला जायचे आहे. त्यामुळे त्याआधी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. बुधवारी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्यावतीनेही मंत्रिमंडळ विस्ताराबाबत संकेत देण्यात आले आहेत.
रविवारच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे केसरकर यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. त्यामुळे लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गृहमंत्री आणि अर्थमंत्री पद भाजपकडे राहणार असल्याची माहिती. तसेच नगरविसाकर मंत्रिपद शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता आहे.
Post a Comment