नगर : अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेची निवडणूक स्थगिती औरंगाबाद उच्च न्यायालयाकडून उठवली. दि.१६ ऑक्टोबर रोजी मतदान तर दि.१७ ऑक्टोबर रोजी मतमोजणीचे घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या
न्यायमूर्ती रविंद्र घुगे व न्यायमूर्ती अर्जुन पेडणेकर यांच्या खंडपीठाने सहकार विभागाला दिले. शिक्षक बँकेच्या निवडणूकीवरील स्थगिती उठवून निवडूक वेळेत घेण्यात यावी यासाठी रोहोकले गुरुजी प्रणित गुरुमाऊली मंडळाच्या १३० कार्यकर्त्यांनी लोकवर्गणीतून माननीय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ८८८६ क्रमांकाची याचिका याचिकाकर्ते जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे, गणेश वाघ गुरुजी, विकास डावखरे, दशरथ ढोले, संतोष खामकर व इतर यांच्या नावाने दाखल करण्यात आलेली होती.
औरंगाबाद खंडपीठात आज सोमवार दि.२६ सप्टेंबर रोजी न्यायमूर्ती रविंद्र घुगे व न्यायमूर्ती अर्जुन पेडणेकर यांचे समोर सुनावणी झाली. माननीय न्यायालयाने सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने निवडणूक ज्या टप्प्यावर स्थगित करण्यात आली होती. त्याच टप्प्यावर पुन्हा सुरू करुन मतदान प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
निवडणूक आहे त्याच टप्प्यावर घेण्याबाबत आग्रही मागणी याचिकाकर्ते वकिल ॲड. गुलाबराव राजळे आणि ॲड. राजेंद्र टेमकर यांच्या मार्फत आजच्या सुनावणी दरम्यान करण्यात आली.
शिक्षक परिषदेचे संघटनात्मक काम सुरू आहेच, मात्र आपल्या दैनंदिन जीवनावर आणि कुटुंबावर थेट परिणाम करणारी आर्थिक संस्था आता फार काळ चुकीच्या प्रवृत्तींच्या हातात राहणार नाही, ह्याची सर्वसामान्य सभासद आणि गुरुजींचे कार्यकर्ते नक्कीच काळजी घेतली.
आतापर्यंत आदरणीय गुरुजींच्या विचाराबरोबरच जिल्हा आहे, हे वारंवार सिद्ध झालेले आहे. वेगवेगळ्या चढ उतारांत सुध्दा सत्य, विश्वासार्हता आणि प्रामाणिक विचारांची साथ करणाऱ्या सर्वसामान्य शिक्षकांचे हे यश असल्याचा प्रतिक्रिया शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे यांनी दिली.
Post a Comment