पंडित दिनदयाळ उपाध्याय थोर राष्ट्रभक्त...

पाथर्डी :  जोपर्यंत भारत देशातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहचत नाही तोपर्यंत विकास झाला नाही अशी विकासाची व्याख्या करणारे, देशातील उपेक्षीत, वंचित घटकांसाठी आयुष्यभर आहोरात्र झटणारे राष्ट्रप्रेमी, प्रखर देशभक्त, अंत्योदयचे प्रणेते देशाचे श्रेष्ठ सुुपुत्र, आदर्श व थोर राष्ट्रभक्त पंडित दिनदयाळ उपाध्याय यांना पाथर्डी शेवगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीने भावपुर्ण आदरांजली अर्पण करून नमन करते असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले.


कासार पिंपळगाव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमानंतर अंत्योदयचे प्रणेते राष्ट्रप्रेमी आदर्श व्यक्तिमत्व पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची जयंतीनिमीत्त आयोजित कार्यक्रमात आ. राजळे बोलत होत्या. डॉ. मृत्युंजय गर्जे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बाळासाहेब आकोलकर, वृध्देश्वरचे संचालक नारायण काकडे आदि प्रमुख यावेळी उपस्थित होते.

दरम्यान शहरातील आमदार मोनिका राजळे यांच्या जनसंपर्क कार्यालयातही पाथर्डी तालुका भाजपाच्या वतीने पंडित दिनदयाळ उपाध्यायजयंती साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे होते तर माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके,माजी जि.प.सदस्य भगवान साठे, माजी पं.स. सदस्य सुनिल ओव्हळ, माजी नगरसेवक अनिल बोरूडे, मंगल कोकाटे, रमेश हंडाळ, प्रा. रमेश काटे, नारायण पालवे, जमीर आतार, नवनाथ नरोटे, शहाजी चितळे आदीसह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

डॉ. गर्जे म्हणाले की, पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या विचारानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतत्वाखाली देशात,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पंकजाताई मुंडे, आमदार मोनिकाताई राजळे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात यशस्वीपणे वाटचाल सुरू आहे. त्यांनी पाहिलेले देश विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होत आहे.हीच त्यांना खरी श्रध्दांजली होय.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहराध्यक्ष अजय भंडारी केले. सूत्रसंचालन तालुका सरचिटणीस जे. बी. वांढेकर यांनी तर आभार युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन वायकर यांनी मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post