लातूर : लातूर येथील थोरमोठे लॉन्स येथे रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३२ च्या रोटरी वर्ष २०२१-२२ सालाकरीता संपन्न झालेल्या यशवंत वार्षिक प्रांतीय पुरस्कार वितरण समारंभात अहमदनगर येथील रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल ला या वर्षाची बेस्ट बॅलन्सड क्लब या बहुमानाची ट्रॉफी ने सन्मानित करण्यात आले. प्रेसिडेंट ईश्वर अशोक बोरा यांना बेस्ट प्रेसिडेंट पुरस्काराने गौरविण्यात आले.
विद्यमान अध्यक्ष व गतवर्षाचे सचिव डॉ. दिलीप बागल यांना बेस्ट क्लब सेक्रेटरीने सन्मानित करण्यात आले. त्यासोबतच २०२१-२२ या वर्षासाठी विविध अशा एकूण २० पुरस्कारांनी रोटरी सेंट्रल अहमदनगरला सन्मानित करण्यात आले.
त्यात डिस्ट्रिक्ट साईटेशन, रोटरी इंटरनॅशनल साइटेशन, दिव्यांगांसाठी जयपूर फूट शिबिर करीता मानांकन, थॅलेसेमिया रुग्णांकरिता विविध रक्तदान शिबिरासाठी बेस्ट ब्लड डोनेशन ट्रॉफी, जन्मतः बाळांना हृदयात छिद्र असणे अगर छत्रीचे ऑपरेशन, बटन होल सर्जरी व ओपन हार्ट सर्जरी करणे करिता साईदीप हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या शिबिरातून ५८ हृदय शस्त्रक्रिया संपन्न केल्याबद्दल बेस्ट चाइल्ड हेल्थकेअर ट्रॉफी, विविध समाज माध्यामातून तसेच प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया या माध्यमातून रोटरी च्या विविध समाजोपयोगी उपक्रमांना उजाळा देण्यासाठी बेस्ट पब्लिक इमेज रेकॉग्निशन, रोटरी ची माहिती व उपक्रम समाजातील तळागळातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी बेस्ट पब्लिक रीलेशनस् ट्रॉफी, क्लब बाबत व सभासदांबाबत ची माहिती क्लब बुलेटिन मार्फत सातत्याने प्रसिद्ध केल्याबद्दल बेस्ट बुलेटिन ट्रॉफी, विविध स्तरावर स्पर्धात्मक स्पर्धा व विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळण्याकरिता घेण्यात आलेल्या स्पर्धा या उपक्रमांसाठी बेस्ट एल्लॉक्युशन कॉमपीटीशन ट्रॉफी, बेस्ट वॉटर मॅनेजमेंट ट्रॉफी, बेस्ट क्लब स्पेशल रेकॉग्निशन, क्लब मार्फत विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आल्याने बेस्ट एनव्हायरर्मेंट प्रोटेक्शन स्पेशल रेकॉग्निशन अशा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सन २०२१-२२ या वर्षातील उत्कृष्ट कार्याबद्दल क्लबचा सन्मान करण्यात आला. माजी प्रांतपाल ओमप्रकाश मोतीपवळे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या समारंभाला प्रांतपाल रुख्मेश जखोटिया, माजी प्रांतपाल सुहास वैद्य, रवी वदलामनी (हैदराबाद), पुणे प्रांताचे प्रांतपाल जैन, लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा डॉ. अर्चना पाटील, रोटरीचे नियोजित प्रांतपाल डॉ. सुरेश साबू, ॲड.सविता मोतीपवळे यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाला अहमदनगर येथून रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल चे माजी प्रांतपाल शिरीष रायते, सौ. वैशाली रायते, ईश्वर बोरा, फर्स्ट लेडी सौ. मीनल बोरा, डॉ. दिलीप बागल, मनीष बोरा, तसेच क्षितिज झावरे, साशी झवर, बिंदू शिरसाठ, सतीश शिंगटे, किरण कालरा, सुयोग झवर, दादासाहेब करंजुले, नचिकेत रसाळ आदी उपस्थित होते.
या यशाचे खरे श्रेय रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलच्या प्रत्येक सभासदाचे असल्याबद्दल आपल्या मनोगतातून व्यक्त होताना ईश्वर बोरा यांनी आवर्जून सांगितले व त्या करीता सर्व क्लब सभासदांचे आभार त्यांनी यावेळी मानले.
तसेच विद्यमान सचिव हरीश नय्यर यांनी सदर प्रांतीय पुरस्कार करीता सर्वतोपरी आवश्यक पाठपुरावा केल्याबद्दल त्यांचे विशेष आभार ही मानलेत. ईश्वर बोरा यांना गतवर्षी देखील रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ च्या बेस्ट डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते व याही वर्षी बेस्ट प्रेसिडेंट चा यश संपादन केल्यामुळे त्यांचा सर्वच स्थरातून कौतुक होत आहे.
Post a Comment