पारनेर : वडनेर बुद्रुक (ता. पारनेर) येथील स्नेहल बाबर ही एम एस फार्मसी इन रेग्युलेटरी अफेअर्स या उच्च शिक्षणासाठी अमेरिकेस रवाना झाली. अमेरिकेतील एज्युकेशन हब म्हणून ओळख असलेल्या बोस्टन येथील नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटीत ती उच्च शिक्षण पूर्ण करणार आहे.
स्नेहल बाबर ही कला साहित्य शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष कारभारी बाबर व वडनेर ग्रामपंचायत सदस्या मनिषा बाबर यांची कन्या आहे. लहानपणापासूनच अत्यंत हुशार असलेल्या स्नेहलचे प्राथमिक शिक्षण वडनेर बुद्रुक येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत, माध्यमिक शिक्षण मुलीकादेवी निघोज, उच्च माध्यमिक शिक्षण विद्याधाम प्रशाला शिरूर येथे झाले. तसेच फार्मसीमधील डिग्री तिने शिरूर येथील सीताबाई थिटे महाविद्यालयात घेतली.
औषध निर्माणशास्त्रात संशोधन करण्याचा मानस असल्याने मास्टर डिग्रीसाठी तिने अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला. तिच्या या निर्णयाला तिच्या पालकांनीही प्रोत्साहन दिले त्यादृष्टीने असणा-या परीक्षेचा अभ्यास तिने यशस्वीरित्या पूर्ण करून प्रवेश परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले.
पोलीस अधिकारी असलेले मामा सतीश पवार, अमेरिकेत अधिकारी पदावर सेवेत असलेले नंदकुमार दिवटे व शिक्षकांचे तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल आ. निलेश लंके यांच्या हस्ते ग्रामस्थांनी सन्मान केला.
आ. निलेश लंके, शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे, पुणे जि प सदस्या सुनीताताई गावडे, जि.प. सदस्या पुष्पाताई वराळ,संदीप पा जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष सचिनभाऊ वराळ,निघोज परिसर पत्रकार संघाचे मार्गदर्शक दत्ताशेठ उनवणे,शिक्षक नेते बापूसाहेब तांबे,शिक्षक बँकेचे मा. चेअरमन गोकुळ कळमकर,शिक्षक बँकेचे व्हा चेअरमन सुयोग पवार ,ऍड संदीप दिवटे,सरपंच सचिनशेठ पठारे श्रीगोंदा शिक्षक पतपेढीचे चेअरमन बबनदादा गाडेकर,शिक्षक नेते गौतम साळवे,सतिश परांडे,मधुकर मगर,राजू इनामदार, संजय बेलाटे यांच्यासह आदींनी अभिनंदन केले आहे तिच्या या यशाचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.
Post a Comment