मेंगलवाडीत बियाणे वाटप... रब्बी हंगाम पिक निहाय प्रशिक्षण मोहिमेचा शुभारंभ...

अमर छत्तीसे 

श्रीगोंदा : महाराष्ट्र शासन कृषि विभाग यांच्यावतीने रब्बी हंगाम पीक निहाय तंत्रज्ञान प्रशिक्षण मोहिम 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर 2022  या कालावधीत राबवली जात आहे. त्या अंतर्गत मौजे मेंगलवाडी (ता श्रीगोंदा जि अहमदनगर) येथे सरपंच प्रतीक्षा धनंजय मेंगवडे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 


या शेतकरी सभेत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान पौष्टिक तृण धान्य उत्पादन कार्यक्रम अंतर्गत  पीक रबी ज्वारी रेवती वाणाचे दोन प्रकल्प एकूण बियाणे 200 किलो शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले. 

बियाणे वितरण करताना कृषि विभाग यांचे मार्फत तालुका कृषि अधिकारी  दीपक सुपेकर यांनी सेवा पंधरवडा, पीक निहाय तंत्रज्ञान, प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्यान्न उदयन योजना या विषयांवर मार्गदर्शन केले तर कृषि सहाय्यक श्री प्रतीक कांबळे यांनी  ज्वारी लागवड तंत्रज्ञान व बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक बाबत मार्गदर्शन केले. 


आत्मा यंत्रणा चे तालुका समन्वक नंदकुमार घोडके यांनी कामगंध सापळे व बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक घेतले. सदरील कार्यक्रमास मेंगलवाडी कृषि गटाचे अध्यक्ष धनंजय मेंगवडे , ग्रामपंचायत सदस्य कृषि विभाग अधिकारी कर्मचारी, शेतकरी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post