नागवडेने कारखान्याने त्या शेतकर्यांना सभासद करावे...

अमर छत्तीसे

श्रीगोंदा : येथील स. म. शिवाजीराव नागवडे सह.साखर कारखाना यांनी एप्रिल 2021 मध्ये 7326 शेतकऱ्यांकडून सभासद होण्यासाठी प्रत्येकी भाग भांडवल व प्रवेश फी रुपये 10100 घेतली होती. 16 महिने त्या सर्व शेतकऱ्यांना सभासद्व देण्यापासून वंचित ठेवण्यात आले होते.


श्रीगोंदा शिरूर तालुक्यातील तरुण शेतकरी भाऊसाहेब पवार, प्रशांत मगर, अभिषेक गिरमकर, सोमनाथ जाधव, रविंद्र मचाले, सिद्धेश्वर नांद्रे, सुनील जाधव, श्रीकांत मगर, महेश पवार, अनंत पवार व इतर शेतकरी 22 सप्टेंबरला प्रादेशिक सहसंचालक साखर अहमदनगर कार्यालय पुढे आमरण उपोषणास बसले होते.

या उपोषण आंदोलनामुळे नागवडे कारखाना प्रशासन खडबडून जागे झाले. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 22(2) नुसार सर्व शेतकरी मानीव  (डीमंड मेंबर)सभासद झाले आहेत. 


त्यानुसार मानवी सभासदांची सहकार कायदा नियम उपविधीनुसार कारखान्याने पात्र व्यक्तींची नावे 'आय' व 'जे' नोंदवही समाविष्ट करून सभासदांना सभासद क्रमांक व भाग दाखले पंधरा दिवसात देण्याचे लेखी आदेश प्रादेशिक सहसंचालक मिलिंद भालेराव यांनी कारखाना प्रशासनास दिले.

उपोषणादरम्यान सर्व शेतकऱ्यांनी जमा झालेल्या भाग भांडवल व प्रवेश प्रवेश फी 7 कोटी 51 लाख रुपये गोळा झाले,त्याचे साधारणपणे 37 लाख रुपये व्याजाच्या रक्कमेचे काय झाले अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

हा सर्वसामान्य कष्टकरी शेतकऱ्यांचा विजय आहे.या निर्णयाची अंमलबजावणी कारखाना प्रशासनाने तात्काळ करावी अशी मागणी उपोषणकर्ते भाऊसाहेब पवार यांनी केली.


उपोषण स्थळी केशव भाऊ मगर, जिजाबापू शिंदे, संदीप नागवडे, जितेंद्र मगर, बाळासाहेब मगर,रफिक इनामदार, बाळासाहेब पवार, किरण कुरुमकर मदन मगर , खिवराज मचाले ,आंकुश नवले व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post