नगर : जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे निवडणूक शासन आदेशान्वये ३० सप्टेंबर २०२२पर्यंत राज्यामध्ये मुसळधार पाऊस व महापूर या स्थितीमुळे ही निवडणूक तात्पुरती स्थगित करण्यात आलेली आहे.
अहमदनगर जिल्ह्यामध्ये इतर स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुकांची तयारी बिनदिक्कतपणे चालू आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षक बँकेची निवडणूक ही तात्काळ घेण्यात यावीअशी मागणी सहकार मंत्री अतुल सावे यांच्याकडेस गुरुमाऊली मंडळाचे नेते बापूसाहेब तांबे व ऐक्य मंडळाचे नेते राजेंद्र निमसे यांनी केली आहे.
प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकी संदर्भात चारही मंडळांच्या उमेदवाऱ्या जाहीर झालेल्या असून त्यांचा प्रचारही अंतिम टप्प्यात आला होता.फक्त मतदान होणे बाकी असतानाच १५ जुलै २०२२ च्या सहकार खात्याच्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आलेली आहे.
ही स्थगिती हटवून त्वरित निवडणुका जाहिर करण्याची मागणी गुरुमाऊली, ऐक्य, शिक्षकभारती व एकल मंच यांच्या संयुक्त आघाडीने निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
सहकार मंत्री अतुल सावे यांनी या प्रश्नांमध्ये थेट लक्ष घालण्याचे आश्वासन दिले असून लवकरच सहकार सचिव यांच्याशी मुंबई येथे चर्चा करून योग्य तो सकारात्मक निर्णय घेण्याबाबत आश्वासित केले.
या शिष्टमंडळात संयुक्त आघाडीचे नेते बापूसाहेब तांबे , राजेंद्र निमसे ,विजय नरवडे , महेश भणभणे ,सुरेश कोळगे आदी उपस्थित होते. आता लवकरच प्राथमिक शिक्षक बँकेची निवडणूक जाहीर होणार असल्यामुळे प्राथमिक शिक्षकांमध्ये समाधानाचे व औत्सुक्याचे वातावरण पसरले आहे.
Post a Comment