राहात्यात कांद्याला मिळाला इतका भाव....

राहाता : येथील बाजार समितीत  रविवारी कांद्याला 1600 रुपयांचा प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.


राहाता बाजार समितीत कांद्याच्या  8617 गोण्यांची आवक झाली. एक नंबर कांद्याला 1200 ते 1600 रुपये भाव मिळाला. दोन नंबर कांद्याला 650 ते 1150 रुपये भाव मिळाला. 

तीन नंबर कांद्याला 300 ते 600 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 600 ते 800 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 100 ते 300 रुपये भाव मिळाला.

कांद्याला चांगला भाव मिळेल अशी आशा कांदा उत्पादकांना लागली आहे. मात्र भाव मिळत नसल्याने नाराजी आहे. आता.नवीन कांदा बाजारात येणार असल्याने भावावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post