पंतप्रधान नरेंद्र मोदी जगात सर्वात लोकप्रिय नेते....

पाथर्डी : सामान्य कुटुंबात जन्म घेऊन देशातील सर्वोच्च पदावर विराजमान होऊन जगात सर्वात जास्त लोकप्रिय नेते होण्याचा मान पंतप्रधान नरेंद्र यांना मिळाला असुन एवढे मोठे यश एका दिवसात मिळाले नसुन या यशामागे अनेक वर्षाचे अथक परिश्रम, त्याग व देशातील सर्वसामान्य जनतेचे आर्शीवाद आहेत.


त्यांच्या वाढदिवसानिमीत्त देशभर सेवा पंधरवाडा साजरा केला जात असुन भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या काळात विविध सामाजीक उपक्रम राबवुन सेवा पंधरवाडा यशस्वी करावा असे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सत्यजित कदम यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पाथर्डी तालुका भाजपा युवा मोर्चाच्या वतीने आमदार मोनिकाताई राजळे यांच्या पाथर्डी शहरातील जनसंपर्क कार्यालयात आयोजीत रक्तदान शिबिराच्या  शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमात अध्यक्षपदावरून कदम बोलत होते.

आमदार मोनिका राजळे,भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर,शहराध्यक्ष अजय भंडारी, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड,डॉ.मृत्युंजय गर्जे, माजी जि.प.सदस्य राहुल राजळे,जेष्ठ नेते बापुसाहेब भोसले, महादेव जायभाये, भिमराव फुंदे, नंदकुमार शेळके, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल गर्जे,अजय रक्ताटे, रविंद्र वायकर, काकासाहेब शिंदे, सुनिल ओव्हळ, काकासाहेब शिंदे, भगवान साठे, चारूदत्त वाघ,अनिल बोरूडे, नामदेव लबडे, महेश बोरूडे, रमेश हंडाळ, मंगल कोकाटे,महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष काशीबाई गोल्हार, ज्योती मंत्री, अर्पण रक्तपेढीच्या भाग्यश्री पवार, प्रा. रमेश काटे, प्रमोद भांडकर, बाळासाहेब गोल्हार, जमीर आतार, राजेंद्र एडके,जगदीश काळे,युवा मोर्चाचे ललीत खेडकर, सोमनाथ अकोलकर, सचिन पालवे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

कदम म्हणाले आमदार मोनिकाताई राजळे यांच्या नेतृत्वाखाली पाथर्डी तालुका भाजपाचे काम अत्यंत चांगले असुन त्यांच्या कामाचे जिल्हयातच नव्हे तर देशभर कौतुक केले जात आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या गेल्या साडे आठ वर्षातील विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम करून  प्रत्येक व्यक्तीपर्यंत जाऊन प्रचार करावा.तसेच आपल्या वार्डात, गावात, गणात, गटात, शहरात रक्तदान शिबीर, वृक्षरोपण, स्वच्छता, व्याख्यान, प्रदर्शन यासारखे समाजीक उपक्रम घेऊन सेवा पंधरवाडा यशस्वी करावा.यावेळी युवा मोर्चाचे अमोल गर्जे, भिमराव फुंदे यांनी ही आपले विचार व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन वायकर,सुत्रसंचालन तालुका सरचिटणीस जे.बी.वांढेकर यांनी तर आभार युवा मोर्चाचे प्रदेश सचिव कुशल भापसे यांनी यांनी मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post