माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या माध्यमातून पारनेरमध्ये " क्युबोटो" टॅक्टर प्रकल्प !

पारनेर : माझ्या मतदारसंघातील सुपा व म्हणे फाटा येथील औद्योगिक वसाहत पाठोपाठ ढवळपुरी व घोसपुरी ( नगर) येथे नवीन औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी प्रयत्नशील असून माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या माध्यमातून पारनेर मध्ये " क्युबोटो" ट्रॅक्टर प्रकल्प उभारणार असण्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांनी पारनेर येथे दिली आहे. 


या कुब्योटो ट्रॅक्टरच्या माध्यमातून पारनेर तालुक्यातील जवळपास १० हजार तरुणांना रोजगार मिळणार असल्याची शक्यता सुद्धा आमदार यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली आहे. पारनेर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण  संस्थेत शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके व पारनेरचे पोलिस निरीक्षक घनश्याम बळप उद्योजक विजया गारूडकर, पारनेर पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद झावरे यांच्या हस्ते ८५ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान समारंभ पार पडला. 

यावेळी प्राचार्य एस.व्ही. जाधव यांच्यासह बाळासाहेब लंके दत्ता कोरडे सोनू नवले सैनिक बँकेचे कार्यकारी संचालक संजय कोरडे यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होत.

यावेळी आमदार निलेश लंके म्हणाले की आयटीआय बेरोजगार तरुणांच्या समस्या काय आहे हे मला माहीत आहे. मी आयटीआय होल्डर असल्याने मला त्याचा अभिमान आहे ज्या मुलांची परिस्थिती नाजुक आहे ते आयटीआय करण्यासाठी मुले येत असतात..पहिले ५ वर्षांनी प्रमाणपत्र मिळायची परंतु आता निकाल लागल्यानंतर दोनच दिवसात हे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना मिळाले असून याचा फायदा त्यांना नोकरी व व्यवसायासाठी निश्चित होणार आहे. 

त्यामुळे आयटीआय वाले उद्योजक होवु शकतात कुठल्याही क्षेत्रात आपले नाव व काम करू शकतात याबाबत काही अडचण आली असता मला संपर्क करा सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन आमदार निलेश लंके यांनी दिले आहे. मी आयटीआय होल्डर असताना स्थानिक आमदार चिठ्ठी मला मिळाली नाही.

परंतु तुम्हाला अडचण येऊन देणार नाही असे असून सुद्धा आमदार लंके यांनी दिली आहे.माझे पण आय टी आय झाले असून आता पदवी मिळाल्यानंतर घराच्यांची अपेक्षा वाढतात.पारनेर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत महिलांनासाठी ट्रेड वाढविणे गरजेचे आहे ज्यामुळे महिलांना आपल्या पायावर उभे राहता येईल कुठल्याही क्षेत्रात काम करा कमी नाही.

आपले वर्चस्व सिद्ध करा फक्त इच्छाशक्ती गरजेचे आहे  आपण यशस्वी उद्योजक होवू शकतात आपल्या पुणे मुंबई अनेक उद्योजक हे‌आयटीआय होल्डर आहे त्यामुळे हताश न होता अनेक संधी उपलब्ध करून दिली तर त्या संधीचे सोने करा. सध्या स्पर्धेच्या युगात कष्टकरी कामगार झाले पाहिजे.

आपले आयुष्य घडवायचे हिच वेळ आहे. त्यामुळे नोकरी बरोबर व्यवसायाची व उद्योग धंदा ची संधि आहे. मला आमदार खासदाराची चिठ्ठी मिळाली नाही परंतु भविष्यात तुमचे कोणते काम काढणार नाही असे आश्वासन सुद्धा आमदार निलेश लंके यांनी दिले आहे.

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या माध्यमातून क्यबोटो ट्रॅक्टर प्रकल्प आणण्यासाठी आपण‌ विशेष प्रयत्नशील असून क्युबोटो सुपा औद्योगिक वसाहतीत १० हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले तर दुसरीकडे सुपा व म्हसणे फाटा येथील औद्योगिक वसाहतीत ढवळपुरी व‌ घोसपुरी येथील औद्योगिक वसाहतीत नवीन आणण्यासाठी सुद्धा खास प्रयत्न करणार असल्याचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post