नगर : अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची वर्षिक सर्वसाधारण सभा आज दिनांक १८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता सुखकर्ता लॉन येथे आयोजित करण्यात आली होती.
शिक्षक बँकेची वर्षिक सर्वसाधारण सभा म्हटली की, सर्वसामान्य सभासद व विरोधी मंडळांना बँकेच्या कारभावर बोलण्याचे हक्काचे व्यासपीठ असायचे त्यामुळे वार्षिक सभेला सभासदांची मोठी उपस्थिती असायची परंतु शिक्षक बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर संपन्न होत आहे.
या सभेकरिता सत्ताधा-यांच्या सभासदविरोधी कारभारामुळे सभासदांनी पाठ फिरवल्याचे पहायला मिळाले.त्यामुळे शिक्षक बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्ताधारी मंडळावर शिक्षक बँकेची वार्षिक सभा कोरमअभावी अर्धा तास तहकुब करण्याची नामुष्की आज ओढावली असल्याची चर्चा समाज माध्यमावर सुरु होती.
Post a Comment