सुप्रिया सुळे यांच्यासमोर दोन गटात वादावादी..

बारामती : जेजुरी ते नीरा नरसिंहपूर रस्ता डोर्ले वाडी गावातून जातो, गावठाणात रस्ता रुंदीकरण 10 मीटर व्हावे की 7 मीटर यावरून गावकऱ्यांमध्ये वाद आहे. याच मुद्यावरून दोन गट सुप्रिया सुळे यांच्यासमोरच वाद घालू लागले. खुद्द सुप्रिया सुळे यांना दोन्ही गटाची समजूत काढावी लागली.


बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी गावातून राज्यमार्गाचे काम सुरू आहे. या ठिकाणी दहा मीटर रुंदीकरण प्रस्तावित आहे. यामध्ये ग्रामस्थांमध्ये वाद आहेत एक गट म्हणाला सदरचा रस्ता सात मीटरचा करण्यात यावा. तर दुसऱ्या गटाने दहा मीटरचा रस्ता व्हावा अशी मागणी केली. 

त्यामुळे या वादाला आणखी तोंड फुटले. सुप्रिया सुळे आज गाव भेटीच्या दौऱ्यावर आल्यानंतर यासंदर्भात एका ग्रामस्थाने त्याची अडचण सांगितली व पाहता पाहता अनेक जण उठून यामध्ये स्वतःची भूमिका मांडू लागले आणि त्यातून गोंधळाला सुरुवात झाली. 

यानंतर सुप्रिया सुळे यांनी सर्व ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्यानंतर ग्रामस्थांची समजूत घालत यातील नेमका वाद समजून घेतला आणि विरोधी पक्षनेते अजित पवार, मी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता एकत्र बसून यावर तोडगा काढू असे आश्वासन दिले. 

यानंतर गोंधळ शांत झाला. दरम्यान याविषयीचा गोंधळ सुमारे अर्धा तास सुरू होता. मात्र सुप्रिया सुळे यांनी एका एका ग्रामस्थांची बाजू समजून घेतली आणि त्यानंतर सर्वांना समजून सांगितले.

सुप्रिया सुळे यांनी अजित पवार व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन दिलं. सुळे यांनी आश्वासन दिल्यानंतर गावकऱ्यांनी संमती दर्शवली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post