नेवासा : गुरुमाऊली रोहकले गटाचे जिल्हा संघटक दत्तात्रय चोथे व त्यांच्या समर्थकांनी गुरुकुल मंडळामध्ये प्रवेश केला . गुरुमाऊली मंडळामध्ये सातत्याने घुसमट होत असून सर्व निर्णय हे एकाधिकारशाहीने घेतली जातात.
सर्वसामान्य सभासदांना ज्या मंडळामध्ये कवडीमोल किंमत आहे, अशा मंडळामध्ये काम करणे अशक्य आहे. गुरुकुल व स्वराज्य मंडळाच्या उमेदवारांना जिल्हाभर खूप मोठा प्रतिसाद मिळत असून या मंडळाचा विजय निश्चित आहे,.
गुरुकुल मंडळांनी सातत्याने शिक्षकउपयोगी व समाज उपयोगी उपक्रम राबवले असून ,या मंडळाला एक वैचारिक बैठक आहे. सर्व निर्णय हे लोकशाही पद्धतीने घेतले जातात . यापुढे मंडळ निवडून आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.
विरोधकांनी कितीही खालच्या पातळीवर जाऊन राजकारण केले तरी गुरुकुलचा सुसंस्कृतपणा अशा कटकारस्थानांना पुरून उरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी जिल्हा उच्च अधिकार समितीचे अध्यक्ष नितीनराव काकडे ,शिक्षकनेते संदीप जंगले, किरण दहातोंडे, अशोक मुठे, शरद खंडागळे ,राजेंद्र गायकवाड, अविनाश काटकर ,मिलिंद जामदार, संजय वाघ ,योगेश महामिने, सुनील ढेरे, विकास वाघ, नितीन राठोड, नितीन पालवे, कैलास चव्हाण आदी गुरुकुल प्रेमी उपस्थित होते.
शिक्षकनेते,साहित्यीक डॉ. संजय कळमकर हेच फक्त शिक्षकांची कामे करणारे एकमेव नेते आहेत . त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गुरुकुल व स्वराज्य युतीला शिक्षक बँकेत निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. येत्या निवडणुकीत गुरुकुल व स्वराज्य मंडळाचे सत्तेवर येईल ही काळ्या दगडावरची रेघ आहे. -दत्तात्रय चोथे
Post a Comment