अकोले : अहमदनगर जिल्हा प्राथ.शिक्षक बँकेच्या निवडणुकीत सभासदांमध्ये रोहोकले गुरुजींनी साडेतीन वर्षात केलेल्या कामाविषयी चांगली मते आहेत.त्यामुळे कितीही खोके कुणाला दिली तरी नेते ओके केले म्हणजे सभासद मात्र ओके होणार नाहीत.
मतदारांमध्ये रोहोकलेगुरूजींच्या विचारांची सुप्त लाट मतदारामध्ये सभासद शेवटच्या टप्प्यात बोलायला लागला असून मा.रावसाहेब रोहोकले प्रणित गुरुमाऊली मंडळाचा मोठ्या मताधिक्याने विजय निश्चित असल्याचा विश्वास विकास मंडळाचे उपाध्यक्ष गोरक्षनाथ देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
बँकेसाठीच्या निवडणुकीतील प्रचाराची रणधुमाळी टोकाला पोहचली आहे. निवडणुकीत चौरंगी लढत होत आहे. रोहोकले गुरुजींनी चेअरमन असताना तीन वर्षांमध्ये केलेला पारदर्शी कारभार, बँकेचा ऐतिहासिक सभासदभिमुख आदर्शवत कारभार सर्वसामान्य सभासदाला भावला आहे.
रोहोकलेगुरूजीप्रणित गुरूमाऊली मंडळाने अकोले तालुक्यात सविता भरितकर या महिलेला व बाळासाहेब बांबळे सारख्या आदर्श शिक्षकाला बँकेची उमेदवारी दिलेली आहे. तसेच विकास मंडळाकरिता संजय भोर व किसन दराने यांसारख्या चांगले शैक्षणिक व सामाजिक काम असणा-या प्रामाणिक उमेदवारांना संधी दिलेली असून त्यांना मतदारांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
त्यामुळे रावसाहेब रोहोकले प्रणित गुरुमाऊली मंडळ प्रचंड मताने अहमदनगर प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीत विजय संपादन करून सभासद पुन्हा एकदा चारित्र्यसंपन्न व प्रमाणिक नेतृत्वाच्या पाठीमागे उभे राहतात. हे सिद्ध दाखवतील
त्यामुळे अकोल्यातून रोहोकले प्रणित गुरुमाऊली मंडळाला मतांची निर्विवाद आघाडी मिळणार असल्याचा विश्वास गोरख देशमुख यांनी व्यक्त केला.

Post a Comment