विकास मंडळाच्या उन्नतीसाठी गुरुकूल स्वराज्य युतीला साथ द्या...


नगर : अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक निवडणुकीसोबतच बहुचर्चित आणि प्राथमिक शिक्षकांचा मानबिंदू असणारे विकास मंडळ विश्वस्त निवडणूक ही त्यासोबत होत आहे .त्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक बँकेबरोबरोबरच  विकास मंडळाचेही पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असून यामध्ये गुरुकुल मंडळाचे पारडे जड आहे.

याबाबत गुरुकुल मंडळाचे नेवासा सर्वसाधारण मतदारसंघातील उमेदवार भास्कर नरसाळे यांनी विकास मंडळाबाबत व आगामी जाहीरनाम्यातील मुद्द्यांबाबत आमच्या प्रतिनिधीशी बातचीत केली.


नरसाळे म्हणाले की जिल्ह्यातील सत्ताधारी  शिक्षक संघटना व मंडळांनी यापूर्वी विकास मंडळाचा विषय कधीही गांभीर्याने घेतला नाही, त्यामुळे आपणा सर्वांचा मानबिंदू असणारे विकास मंडळ दुर्लक्षित राहिलं त्यामुळे खऱ्या अर्थाने विकास मंडळाचा विकास करण्यासाठी गुरुकुल व स्वराज्य युती ला मतदारांनी भरघोस मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले.

याबाबत जाहीरनाम्यावर बोलताना ते म्हणाले की गुरुकुल व स्वराज्य मंडळाने विकास मंडळाबाबतचा दिलेला जाहीरनामा हा कोणताही आभासी स्वरूपाचा नसून प्रत्यक्षात करता येईल, असेच मुद्दे त्यामध्ये आहेत फक्त एकच संघटना ,नेता, अथवा  मंडळ विकास मंडळाचे बांधकाम पूर्ण करू शकत नाही. 

त्यासाठी संघटना व मंडळ विरहित सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. यापूर्वी फक्त आम्हीच विकास मंडळाचे बांधकाम करू असा दावा एका मंडळांने केला होता ,त्याचे काय झाले हे संपूर्ण जिल्हा जाणतो. त्यासाठी सर्व मंडळांना सोबत घेऊन विकास मंडळाचे बांधकाम सत्तेवर आल्यास लगेच पूर्ण केले जाईल.

त्या ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारून त्यामध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येतील त्यासाठी सर्व प्राथमिक शिक्षक सेवानिवृत्तांसह सर्वांच्या कुटुंबांवर अत्यल्प दरामध्ये उपचार केले जातील. तेथे नियुक्त केलेले डॉक्टर्स हे आपल्या प्राथमिक शिक्षकांची मुले असतील.

तसेच जिल्हा परिषद व नगरपालिकेमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना पूर्णतः मोफत उपचार दिले जातील, तसेच सध्याच्या इमारतीच्या समोरच्या बाजूला व्यापारी संकुल उभारून त्यामध्ये जे गाळे तयार केले जातील, त्यासाठी अतिशय पारदर्शी पुणे निविदा प्रक्रिया करून फक्त प्राथमिक शिक्षकांनाच त्या निविदेत भाग घेता येईल. 

हा नियम लागू केला जाईल. जेणेकरून या वास्तूचा उपयोग फक्त प्राथमिक शिक्षकांनाच होईल हा दृष्टिकोन गुरुकुल आणि स्वराज्य मंडळाने ठेवला असल्याचे ते म्हणाले .सत्तेवर आल्यास संघटना व मंडळ विरहित काम करणार असल्याचे सांगून त्यासाठी अतिशय पारदर्शक कामकाज केले जाईल ,असे त्यांनी ठामपणे सांगितले. 

यासाठी शिक्षक बँक व विकास मंडळासाठी गुरुकुल व स्वराज्य मंडळाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिकाने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.


या पंचवार्षिक निवडणुकीत अनेक मंडळे व चार पॅनल तयार झाले आहेत,परंतु विकास मंडळाचे काम करायचे असल्यास संघटना विरहित व मंडळ विरहित सर्व शिक्षकांनी साथ देणे गरजेचे आहे ,गुरुकुल व स्वराज्य युती सत्तेवर आल्यास विकास मंडळाच्या बाबतीत कुठलेही मंडळ किंवा संघटना असा भेदाभेद न करता सर्व शिक्षक बंधू-भगिनी केंद्रस्थानी मानून  विकास मंडळाचे कामकाज केले जाईल.- भास्कर नरसाळे, उमेदवार विकास मंडळ, नेवासा, सर्वसाधारण मतदारसंघ !

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post