राहुरी : शिक्षक बँकेची स्थापना नगरपालिकेच्या शिक्षकांनी केली हे वास्तव आहे. म्हणूनच शिक्षक बँकेच्या घटनेत संस्थापक या नात्याने नगरपालिका शिक्षकांना कायमस्वरूपी दोन जागा राखीव ठेवल्या आहेत.
बँकेच्या विस्ताराच्या धोरणानुसार जिल्हा परिषद शिक्षकांचे प्राबल्य जसजसे वाढायला लागले व नगरपालिका शिक्षकांची संख्याही हळूहळू कमी व्हायला लागली. त्यामुळे २० वर्षापुर्वी नगरपालिका मतदार संघात नॉनटिचींगची घटनादुरूस्ती झाली.
राजकीय फायदा व्हावा म्हणून विस्तारीधिका-यांना एक जागा प्रत्येक मंडळ सोडू लागल्यामुळे नगरपालिका शिक्षकांना एका जागेवर समाधान मानण्याची वेळ आली. परंतु रोहोकलेप्रणित गुरूमाऊली मंडळाने नगरपालिका व मनपाच्या दोन्हीही जागांवर शिक्षकांना संधी दिल्यामुळे नगरपालिका व मनपामध्ये रोहोकलेप्रणित गुरूमाऊलीची स्थिती भक्कम असल्याचे प्रतिपादन संजय शिंदे यांनी केले. करावे राहुरी नगरपालिकेत शिक्षक बँकेच्या प्रचारानिमित्ताने ते बोलत होते.
ज्या प्रवृत्तींनी व्यक्तिगत आर्थिक स्वार्थ व श्रेयवादावरून विकास मंडळाच्या वैभवात भऱ टाकनारे बांधकाम बंद पाडले. अशा प्रवृत्तींना सभासद मत देतील काय ? असा प्रश्न संजय शिंदे यांनी उपस्थित केला.
राहुरी नगरपालिका रोहोकलेप्रणित गुरूमाऊली मंडळाला भऱघोस मत्ताधिक्य देणार असल्याचे आश्वासन विकास मंडळाचे उमेदवार आमोल लांबे यांनी दिले.
यावेळी उमेदवार अल्ताफ शहा,शिवाजी नवाळे, किरण रोकडे,प्रवीण ठुबे,शरद कोतकर, उर्दू विभाग जिल्हाध्यक्ष बदर सर,माजी विश्वस्त अविनाश साठे,बाळासाहेब रोहोकले,जलील सर ,कृष्णा म्हस्के,नवनाथ लाड,सुगतकुमार वाघमारे, बाळासाहेब गोरे,मनोज पालवे,राजेंद्र राठोड, राजेंद्र बोकंद,अजित रेपाळे,पवार सर,पिंजारी सर,अनिस सर,फारुख शहा,बोरुडे सर,राजेंद्र भोसले सर,महेश भगत सर आदी उपस्थित होते.




Post a Comment