कर्जत : कर्जत तालुका यावेळी रोहोकलेप्रणित गुरूमाऊलीलाच आघाडी देणार असल्याचा विश्वास अशोक बचाटे यांनी झंझावाती प्रचारा दरम्यान व्यक्त केला.
तालुकाध्यक्ष, तनपुरे मॅडम, लगड मॅडम, सौ.छायाताई मुन्ने मॅडम सौ. सोमवंशी मॅडम यांनी आज थेरवडी, बेनवडी, देशमुखवाडी, कानगुडवाडी, राशीन मुले, राशीन मुली, जगताप घालमे वस्ती, चिलवडी, बर्गेवस्ती, नवलेवस्ती, होलेवाडी, राऊतवस्ती, जाधव वस्ती, राशीन (ऊर्दु)या शाळांना भेटी दिल्या.
रणजित सुद्रीक ,तालुकाध्यक्ष राजेंद्र लोंढे,श्री संतोष गावडे, श्री अविनाश पवार सर, श्री संतोष वायकर सर यांनी आज रेहकुरी,वळवड,बिटकेवडी,चांदे बु.रमजान चिंचोली, ज्योतिबाची वाडी,कोकणगाव या शाळांना भेटी दिल्या.
शिक्षक बांधवांशी चर्चा करत मनमोकळेपणाने संवाद साधतांना गुरुजींनी केलेला कारभार व मंडळाचा वचननामा तसेच आणखी सभासद हितासाठी काय करता येईल यावर सुसंवाद साधला. सर्वच ठिकाणी प्रतिसाद अतिशय सकारात्मक मिळाला.बहुतांश ठिकाणी गुरुजींच्या कारभाराबद्दल शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.




Post a Comment