नगर : दोन्ही गुरुमाऊलींना डीसीपीएस धारकांना मतदान मागण्याचा नैतिक अधिकार नाही, असे स्पष्ट मत जुनी हक्क पेन्शन समितीचे जिल्हाध्यक्ष कैलास ठाणगे यांनी मांडले.
ठाणगे म्हणाले की, शिक्षक बँकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच संघटना डीसीपीएस धारकांना आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न करू लागलेले आहेत. परंतु दोन्ही गुरूमाऊलींना मत मागण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, कारण डीसीपीएस बांधवांच्या कोणत्याही समस्येसाठी दोन्हीही गुरुमाऊली मंडळांनी जिल्हा परिषद व शासन दरबारी कोणतेही प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही.
तसेच निवडणुकीमध्ये तिकीट वाटपात एवढ्या मोठ्या प्रतिनिधींना उमेदवारी मध्ये प्राधान्य दिले नाही. निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यातील अनेक नेते डीसीपीएस बांधवांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत .परंतु आत्तापर्यंत डीसीपीएस च्या सर्व आंदोलन व समस्यांसाठी पाठपुरावा फक्त स्वराज्य मंडळ व गुरुकुल मंडळातील नेत्यांनी केलेला आहे.
डॉ. संजय कळमकर सरांच्या नेतृत्वाखाली जिल्हा व राज्य पातळीवर अनेक मंत्री महोदयांच्या मार्फत धारकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न शासन दरबारी मांडण्याचे काम अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक समिती जुनी हक्क पेन्शन संघटन यांनी केलेले आहे .येत्या काळामध्ये ही डॉ.संजय कळमकर व जिल्हाध्यक्ष राजेंद्र ठोकळ, कैलास ठाणगे यांच्या नेतृत्वाखाली समस्यांचा पाठपुरावा केला जाईल.
डीसीपीएस बांधवांच्या सर्व समस्या जोपर्यंत सुटत नाहीत. तोपर्यंत गुरुकुल आणि स्वराज्य मंडळ बांधवांशी कटिबद्ध आहे. शासन दरबारी वेळोवेळी त्याचा योग्य पाठपुरावा केला जाईल अशी माहिती जुनी हक्क पेन्शन समितीचे जिल्हाध्यक्ष कैलास ठाणगे यांनी दिली.
यावेळी राज्य प्रतिनिधी ऋषी गोरे, प्रताप पवार ,सरचिटणीस रवींद्र धाकतोडे ,कार्याध्यक्ष अनिल शिंदे, दत्ता राठोड उपाध्यक्ष ,अमोल दळवी, अशोक गुंजाळ, युवराज हिलाळ, श्याम राठोड ,अशोक घालमे, विजयकुमार जाधव, साई कुमार शिंदे, नितीन भोईटे ,भाऊसाहेब गिरमकर, शरद गावडे ,संतोष अनभुले ,दीपक बडे, राहुल आठरे, प्रकाश मुरकुटे, संदीप मगर, संदीप खाडे आदी सर्व पदाधिकारी, डीसीपीएस बांधव उपस्थित होते.
एकाही डीसीपीएस बांधवांना उमेदवारी न देता आम्हाला दुर्लक्षित केल्यामुळे जिल्हाभरातील तरुण शिक्षक बांधव गुरुमाऊली मंडळाच्या विरोधात मतदान करणार आहेत. - राज कदम, डीसीपीएस नेते, अहमदनगर




Post a Comment