संगमनेर : अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीमध्ये रोहोकले गुरुजींच्या विचारांची सुप्त लाट असून मा.रावसाहेब रोहोकले प्रणित गुरुमाऊली मंडळाचाच मोठा विजय होणार असल्याचा विश्वास महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उच्च अधिकार समितीचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष आर. पी. राहणे यांनी व्यक्त केला आहे.
बँकेसाठीच्या निवडणुकीतील प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहचली आहे. निवडणुकीत चौरंगी लढत होत आहे. रोहोकले गुरुजींनी चेअरमन असताना तीन वर्षांमध्ये सर्व सभासद व संचालक यांना बरोबर घेऊन केलेला बँकेचा ऐतिहासिक सभासदभिमुख आदर्शवत कारभार सर्वसामान्य सभासदाला भावला आहे.
त्यानंतरच्या अडीच वर्षांमध्ये बँकेत झालेली कुटनिती व भ्रष्टाचार सुद्धा सुज्ञ सभासद जाणून आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे सत्ताधारी मंडळाविषयी सभासदामध्ये संतापाची लाट असून पैशाचा वापर करून इतर मंडळातील छोटे-मोठे कार्यकर्ते फोडून वातावरण निर्मितीचा केविलवाना प्रयत्न सत्ताधारी करत आहेत. सुज्ञ सभासदांचा सत्ता परिवर्तनाचा निर्धार व रोहोकले गुरुजींच्या प्रामाणिक नेतृत्वावरील विश्वास कायम आहे. त्यातूनच निर्माण झालेली सुप्त लाट अनेकांना असमान दाखविल्याशिवाय राहणार नाही.
संजय शेळके,संजय शिंदे प्रवीण ठुबे, विकास डावखरे यासारखे शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असलेले प्रामाणिक संघटनेत हयात घातलेले उमेदवार व शिक्षक मित्र समूहाच्या माध्यमातून जिल्हाभरातील शिक्षकांच्या सेवेत कायम तत्पर असलेले शरद कोतकर व शिवाजी नवाळे यासारखे तंत्रस्नेही तरुण चेहरे, जिल्ह्यात सर्वच चारित्र्यसंपन्न प्रामाणिक उमेदवार दिल्याने गुरुजींवरील सभासदांचा विश्वास आणखी दृढ झाला आहे.
संगमनेर तालुक्यातही अहमदनगर प्राथमिक शिक्षक बँकेसाठी संतोष भोर व ज्योती डोखे आणि विकास मंडळासाठी अशोक मधे या सर्वसामान्य प्रामाणिक उमेदवारांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
१७ ऑक्टोबरला रावसाहेब रोहोकले प्रणित गुरुमाऊली मंडळ प्रचंड मताने अहमदनगर प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीत विजय संपादन करून सभासद चारित्र्यसंपन्न व प्रमाणिक नेतृत्वाच्या पाठीमागे उभे राहतात हे पुन्हा एकदा सिद्ध होणार आहे असेही आर.पी. राहणे म्हणाले.

Post a Comment