नेते व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह...

नगर : जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या 16 जागांसाठी रविवार (ता. 16)ला मतदान होत आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतदान सुरु झालेले आहे. मतदान केंद्राच्या बाहेर उमेदवार कार्यकर्ते उभे राहिलेले असून मतदारांना मतदान करावे यासाठी हात जोडून आवाहन करीत आहेत.


जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या 21 जागांसाठी रविवारी मतदान होत आहे. जिल्ह्यातील एकूण 30 केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडत आहे. जिल्ह्यात एकूण  १० हजार ४५६ मतदार आपला मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. 

या निवडणुकीच्या मतदान व मतमोजणी प्रक्रियेची तयारी जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक विभागाने केली आहे. मतदान प्रक्रियेसाठी ४५० तर मतमोजणीसाठी २५० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.  
सोमवार (ता. 17)ला मतमोजणी होणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरवात होणार आहे. नेप्ती परिसरातील 

अमरज्योत मंगल कार्यालयात स्टॉगरुम करण्यात आली असून येथेच मतमोजणी होणार आहे.

नेते मंडळींनी सकाळीच आपल्या मतमोजणी केंद्रावर मतदान केले असून तालुका व शेजारील तालुक्यातील मतदान केंद्रांना भेटी देत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post