ई पिक पहाणी नोंदणीसाठी महसूलने घेतला वसतीगृहाचा आसरा...

अमर छत्तीसे 

नगर : जिल्हयातील एका तालुक्यात ई पिक पाहणीत सर्वात मागे आहे.  त्यामुळे आकडेवारी फुगवून दाखवण्यासाठी एक दुय्यम दर्जाच्या अधिकार्याने चक्क एका वसतीगृहाचा आधार घेतला असल्याची चर्चा शेतकर्यांमध्ये सुरु आहे.


राज्य शासनाच्या महसूल विभागाने ई पिक पहाणी करण्याच्या सूचना सर्वांना दिल्या आहेत. या संदर्भात शेतकरी वर्गात जागरुकता आणण्यासाठी महसूल विभागाने आपल्या तलाठी, मंडळ अधिकारी यांना आदेशीत केले होते. 

त्यामुळे शेतकरी स्वतः च्या पिकाची स्वत:च नोंद करु शकणार आहे पण आज १५ला ही नोंदणी करण्यासाठी अंतिम मुदत होती. त्यामुळे वरिष्ठ कार्यालयातून पिक पहाणीची आकडेवारी किती याबाबत विचारणा होणार हे ग्रहित धरुन संबंधित तालुक्यातील एका अधिकार्यांनी वसतीगृहाचा आधार घेऊन तेथील विद्यार्थीनींचे मोबाईल घेऊन त्यावरून पिक पहाणी केली असल्याची चर्चा आहे. संबंधित अधिकारी रात्री उशिरा पर्यंत त्या वसतीगृहात ठाण मांडून होते.

पण इतरवेळी प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकाची नोंद करणे गरजेचे असते. पण या एका ठिकाणी बसून नोंदी करण्यात त्या अधिकार्याला नेमके काय साध्य करायचे आहे, असा सवाल शेतकर्यांमधून उपस्थित केला जात आहे. महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यात हा  प्रकार होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post