शिक्षक बॅंकेवर पुन्हा सत्ताधारी तांबे गटाचे वर्चस्व

नगर ः अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या निवडणुकीत गुरुमाऊली मंडळाच्या बापूसाहेब तांबे गटाने निर्णय आघाडी घेतली आहे. एक हजाराच्या मतांच्या फरकाने त्यांचे पाच उमेदवार आघाडीवर आहेत.


जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या 21 जागासाठी रविवारी मतदान झाले आज सकाळपासून या मतमोजणी सुरुवात झाली एकूण चार मंडळी या निवडणुकीत उतरली होती. गुरुमाऊलीचा रोहकले घाट आणि सदिच्छा व गुरुकुल ही मंडळे आमने-सामने होती. बँकेवर गुरुमाऊलीच्या तांबे गटाची सत्ता आहे.

जिल्ह्यातील गुरुजींनी पुन्हा त्यांच्याच मंडळावर विश्वास दाखवत बँकेचे चाव्या हाती दिल्या. दुपारपर्यंत तसा होता. विजय दृष्टी प्रताप दिसू लागतात तांबे गटाच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक परिसरात छत्री घेत डीजे लावून जल्लोष केला. 

मतमोजणी सुरु झाल्यापासून सर्व शिक्षकांमध्ये कोण विजयी होणार याकडे सर्वांचे  लक्ष लागले होते. त्यात बापू तांबे गटाने आघाडी घेतल्यानंतर विरोधी मंडळांनी मतमोजणी केंद्रातून काढता पाय घेतला. नेत्यांसह कार्यकर्तेही गायब झाले होते. अनेक शिक्षकांनी तांबे विजयी  होत असल्याची माहिती समजताच शाळा अर्ध्यावरती सोडून मतमोजणी केंद्र जवळ केले. 

रोहकले प्रणित गुरुमाऊली गटाने चांगली लढत दिली आहे. मात्र या मंडळातील पारनेर तालुक्यातील एका नेत्याचा अतिआत्मविश्वास त्यांना नडला. त्या आत्मविश्वास यामुळे मंडळाचा पराभव झाल्याची प्रतिक्रिया रोहकले प्रणित गुरुमाऊली मंडळातील एका नेत्याने दिली. 


या निवडणुकीत एका मंडळाने काहींना पाकिटे दिली. त्या पाकिटांमुळे त्या मंडळाचा नेहमीच उदोउदो  केलेला आहे. ही उदोउदो करणारी मंडळी ठरलेली असून त्यांनी कितीची पाकिटे घेतली याची सविस्तर आकडेवारीची चर्चा शिक्षकांमध्ये सुरु होती. 

उमेदवार निहाय मतदान : संगमनेर - योगेश थोरात - नारळ 2272,  संतोष भोर - मशाल - 2418,  भाऊराव रहिंज - छत्री - 3532,  दीपाली रेपाळे - कपबशी - 1957 . नगर - कोतकर शरद - मशाल - २९८४, संजय धामणे - नारळ - २१९५, महेंद्र भणभणे - छत्री - ३१७३, संजय म्हस्के - विमान - १९.,  शेख रहिमान - कप - १८२०. पारनेर  ः संभाजी औटी - नारळ - २२८५, सूर्यकांत काळे - छत्री ३४७६, प्रकाश केदारी - अलामारी - २९,  रघुनाथ झावरे - कपबशी - १८०१, प्रवीण ठुबे - मशाल - २६०७. कोपरगाव - सुभाष गरुड - मशाल - २४४९, शाशिकांत जेजुरकर - छत्री - ३४९८, रमेश निकम - कपबशी - १८७७, ज्ञानेश्वर सईदने - नारळ - २३७८. राहाता - राजेंद्र देठे - कपबशी - १८९१, संजय नळे - नारळ -२३७४, वैशाली नाईक - मशाल -२५१९, योगेश वाघमारे - छत्री - ३४०५.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post