नगर : गेल्या महिनाभरापासून लम्पी रोगामुळे जिल्ह्यातील पशुधन संकटात आहे. या लम्पीचा अटकाव करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाचे शर्थीचे प्रयत्न सुरू असतांना संसर्ग कमी होण्याचे नाव घेण्यास तयार नाही.
रविवारी नव्याने 430 जनावरांना लम्पीची बाधा झाली असून मृत जनावरांची संख्या 35 ने वाढली आहे. एकूण मृत जनावरांची संख्या आता 507 झाली आहे.
जिल्ह्यात मोठ्या संख्येने गोवर्गीय जनावरांना लम्पीचा संसर्ग होत आहे. पशुसंवर्धन विभागाने महिनाभरापासून वेगवानपणे लसीकरण सुरू केल्यानंतरही लम्पीचा प्रभाव कमी होतांना दिसत नाही.
आतापर्यंत जिल्ह्यात 216 गावात लम्पी बाधीत जनावरे असून याठिकाणी 9 हजार 30 जनावरांना लम्पीची बाधा झालेली आहे. यातील 5 हजार 215 जनावरांनी लम्पीवर मात केली असली तरी 507 जनावरांचा लम्पीत मृत्यू झालेला आहे.
लम्पीचे रुग्ण सापडलेल्या गावांच्या पाच किलो मीटरच्या परिसारातील 1 हजार 119 गावातील जनावरांना लम्पीची शक्यता असल्याने त्याठिकाणी पशूसंवर्धन विभागाने लसीकरण सुरूकेले आहे. मात्र, तरी ही नव्याने लम्पी संसर्गाचे प्रमाण दररोज वाढतांना दिसत आहे.

Post a Comment